नेवासा
गजानन महाराज हे बाह्यांगाने साधे होते. मात्र, ते सिध्द पुरूष होते. त्यामुळे त्यांनी जगाला समता, बंधुता, स्वच्छता यातूनच भक्ती मार्गाचा संदेश दिला असे प्रतिपादन गायनाचार्य बाळासाहेब महाराज रंजाळे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथे गजानन महाराज प्रकटदिन सोहळ्यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय किर्तन महोत्सवात ३ रे पुष्प गुंफताना ऐसे काहो न करा काही या अभंगाचे निरुपण करताना ते बोलत होते. यावेळी आयोजक प्राचार्य गणेश देशमुख यांनी पुष्पहार घालुन त्यांचे पूजन केले.
रंजाळे महाराज पुढे म्हणाले, आपण किती दिवस जगलो, यापेक्षा कसे जगलो, समाज माणसात याला जास्त महत्व असते. आनंदी राहण्यासाठी
पैशाने श्रीमंत राहण्यापेक्षा मनाची श्रीमंती दाखवल्याने समाजात मोठ होता येत. आपल्या सुखाला आणि दुखालाही आपला स्वभावच जबाबदार असतो. मग नम्र होणे म्हणजेच, स्वभाव चांगला असणे होय. जन्माला आल्यानंतर कर्म कराव लागत आणि
भोगावही लागत. आपल्या कर्मानुसार प्रारब्ध बनत. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला समाधानासाठी वेगळी धावपळ करण्याची गरजच
वाटणार नाही. त्यामुळे नाशिवंत कर्म करण्यापेक्षा अविनाशी कर्म करा, तुमचं संर्पण कुटूंबाला सुख मिळाल्याशिवाय राहणार. संत अविनाशी कर्म करत राहिले म्हणून त्यांना जगाचा उध्दार करता आला. आज विज्ञान प्रगत झाल, जग सुखी आहे, ते केवळ।संत साहित्यामुळेच, संसारात कितीही दुख असले, तरी सात्विक विचाराने तो आनंदी करता येतो. संताच्या नामाचा जप केला तरी आपला उध्दार होतो. गजानन महाराज हे बाह्यांगाने साधे होते. मात्र, ते सिध्द पुरूष होते. त्यामुळे त्यांनी जगाला समता, बंधुता, स्वच्छता यातूनच भक्ती मार्गाचा संदेश दिला.
यावेळी प्रा. नारायणराव म्हस्के, रोहिदास लंघे, आबासाहेब देशमुख, नितीनराव देशमुख, कपूर कर्डिले, नामदेव बोरुडे, बाळासाहेब साळुंखे, हरीभाऊ लंघे, अनिल नाबदे, अजहर शेख, सुनील नजन, अरुण देशमुख, लक्ष्मण लंघे, अमर मोहिते, हरिभाऊ आगळे, पांडुरंग गणगे, अमोल खैरे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


