नेवासा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाच्या धर्तीवर सरपंच शरद आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्री सेवा दल आणी छात्र भारती महाराष्ट्र राज्यातील ३५१ तालुक्यात जातमुक्ती अभियान राबविण्याचा निर्धार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे यांनी व्यक्त केला.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने जातमुक्तीच्या निर्णय घेतल्याबद्दल गावचे सरपंच,उपसरपंच व ग्रामस्थांचा सौंदाळा येथे राष्ट्र सेवा दल, छात्र भारती महाराष्ट्र राज्य व अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात अजित शिंदे बोलत होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याध्यक्ष माधव बावगे, हिरालाल पगडाल, राम चन्ना, जयदेव डोळे, डॉ. नामदेवराव गुंजाळ, डॉ. सागर भालेराव, ऍड .अरूण जाधव,
कॉ.बाबा आरगडे,सरपंच शरद आरगडे,
उपसरपंच भिवसेन गरड, गणेश आरगडे,लक्ष्मण आरगडे, बाळासाहेब बोधक, भारत आरगडे, उत्तमराव आरगडे, बाळासाहेब आरगडे,मधुकर आरगडे, कृष्णा चामुटे,ज्ञानदेव चामुटे, मंगल बोधक, क्रांती आरगडे, ज्योती बोधक, कावेरी आढागळे,श्रीमती झावरे आदी यावेळी उपस्थित होते.
राष्ट्र सेवा दलाचे राजाभाऊ कांदाळकर यांनी सौंदाळा गावाने आता महाराष्ट्र जातमुक्त करण्यासाठी नेतृत्व करावे
असे आवाहन केले.
राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा कांदळकर, छात्रभारतीचे राज्य अध्यक्ष अनिकेत घुले, पत्रकार विचारवंत जयदेव डोळे, प्राध्यापक हिरालाल पगडाळ, सागर भालेराव, लक्ष्मीकांत देशमुख, उत्कर्षा रूपवते, विशाल शिंदे, संदीप काकड यांची ही या वेळी भाषणे झाली.
या कार्यक्रमात सरपंच शरद आरगडे व कॉ.बाबा आरगडे यांच्यासह उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुखांचा महात्मा फुले यांची पगडी,घोंगडी व संविधान देऊन सत्कार करण्यात आला.
बाबासाहेब बोधक यांनी आभार मानले


