Wednesday, May 13, 2026

तरवडी सत्यशोधक साहित्यिक दीनमित्रकारांच्या कार्याने राज्यात परिचित गाव-अड.देसाई देशमुख

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील तरवडी हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सत्यशोधक साहित्यिक  दीनमित्रकारांच्या कार्याने राज्यात परिचित असलेलं गाव आहे .अशा ठिकाणी मराठी भाषा दिनानिमित्त होत असलेले साहित्य संम्मेलन नव साहित्यिकांना प्रेरणादायक ठरेल,असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ देसाई देशमुख यांनी केले.

नेवासा तालुक्यातील तरवडी येथे सुसंकल्प साहित्यिक व सामाजिक संघटनेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दि.२२ मार्च रोजी सोमेश्वर मंदिर सभागृहात आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन अड.देसाई देशमुख यांचे हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.कवी गीतकार बाबासाहेब पवार यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
डॉ.राजेद्रं फंड यांनी स्वागताध्यक्ष पदाची।स्विकारली. मौलाना शमशाद शाहिद पठाण, फादर राजेंद्र कांबळे,भंतीजी पाटेकर,पंचपुरी महाराज या संतांच्या हस्ते द्विप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाला स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटनेचे अध्यक्ष गिरीश राजूरकर, निर्माता दिग्दर्शक बांगर,सुरेश कांबळे, डॉ.शाम जाधव,मनिष मुथ्था, रामभाऊ आवारे,श्री.मोकळ, सुनिता वाळुंज, ॲड.विजयकुमार कस्तुरे, प्रा.डि.के.मांडलिक, बाळासाहेब कनगरे,दिलीप मांडलिक,राहूल जावळे,राजेद्रं बागडे,बंडु पाटील, सातपुते गुरुजी, प्रा.संजय दरवडे, प्रभाकर खंडागळे,अरुण मिसाळ,तसेच नांदेड, बुलढाणा,बिड,परतुर, अमरावती,चिखली संभाजी नगर,पुणे नाशिक, पुरंदर,नगर.या ठिकाणावरुन साहित्यिक,कवी विचारवंत, सिनेकलावंत यांची उपस्थिती लाभली.

आमदार विठ्ठलराव लंघे यांनी उपस्थित राहून संमेलनाला शुभेच्छा दिल्या.साहित्यिक भाऊसाहेब सावंत, राजेंद्र फंड, बाबासाहेब पवार, अब्दुलभैय्या शेख यांनी मार्गदर्शन केले.

संमेलनाचे आयोजक साहित्यिक सायमन भारस्कर यांनी प्रास्ताविक केले.संमेलनाचे उपाध्यक्ष हरीभाऊ गवळी,शंकर कन्हेरकर, बंडु नाईक, सुधिर भारस्कर,अनिकेत भारस्कर,दत्तु भारस्कर,अनिल सरोदे यांनी संमेलन यशस्वीत्यासाठी परिश्रम घेतले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!