Wednesday, June 24, 2026

गोंडेगावच्या जनकल्याण फौंडेशनचे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील गोडेगांव येथील  जनकल्याण फौंडेशनचे सन २०२६ चे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा मार्ट मध्ये गुरूवार दि.३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता माजी सहाय्यक पोलीस आयुक्त बाबासाहेब बुधवंत यांचे हस्ते,
आमदार विठ्ठलरावजी लंघे अध्यक्षतेखाली व अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य सल्लागार कॉ.बाबा आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात जनकल्याण फौंडेशनचे संत तुकडोजी महाराज पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली.

*समाजभूषण पुरस्कारार्थी:—
साथी सुभाष वारे (सामाजिक),
संजय भाऊसाहेब दवंगे (साहित्य),
श्रीमती बाली दगडु थुट्टे (आरोग्य),
भागवत बाबुराव गायकवाड (कृषि), बाबा बेलापुरकर (पत्रकारीता),
गोकुळ गायकवाड (समाजभुषण).

*विशेष पुरस्कार :-अजिंक्य सोनवणे(कलावंत),संपतराव दरवडे(ग्रंथपाल),अशोक पंडीत (आदर्श शिक्षक).

*कविवर्य पुरस्कार:- कवी के.बी.शेख, सुनिता वाळुंज, कवी हसनभाई अत्तर,कवी बबनराव आढाव,कवी मते रावसाहेब.

गुरूवार दि.३० रोजी दुपारी २ ते ५ यावेळेत कवी संम्मेलन व सायंकाळी ५ वाजाता होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थितीत राहण्याचे आवाहन जनकल्याण फौंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग रोडगे,सुरेश  रोडगे व रामदास नजन  यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!