Wednesday, May 13, 2026

उद्या ‘आनंदवन’च्या पुररस्कारांचे वितरण

IMG-20260511-WA0029
IMG-20260511-WA0029
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

नेवासा तालुक्यातील सोनई येथील आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वतीने वर्धापनदिनानिमित्त देण्यात पसायदान पुरस्कारांचे वितरण मंगळवार दि. 12 मे रोजी सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक यांचे शुभहस्ते होत आहे.

 

सोनई येथील मुळा बाजार शेजारील
आनंदवन ध्यानमंदीर प्रांगण, जगदंबादेवी मंदीराच्या पाठीमागे येथे 12 मे रोजी सांयकाळी 6 वाजता नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख व , शैनेश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांचे प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमात वारकरी संस्थेचे पंढरीनाथ महाराज तांदळे, घोडेगाव येथील डॉ. संजय सोनवणे व साई आदर्श मल्टीस्टेटचे शिवाजीराव कपाळे यांना पसायदन पुरस्कार तर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व.सोपानराव दरंदले यांच्या स्मरणार्थ दिला जाणाऱ्या पत्रकारिता पुरस्काराने अग्रोवनचे पत्रकार सूर्यकांत नेटके यांना पत्रकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या सोबतच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय निवड झालेले डॉ. देवयानी रविकांत ससाणे, ओंकार नितीन दरंदले व प्रसाद महाराज तरवडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान होईल स्मृतिचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आनंदवन संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे, सचिव संजय गर्जे, गोविंद महाराज निमसे, विनायक दरंदले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!