सोनई/प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या संकल्पनेला धरून यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व मुळा उद्योग समूहाच्या वतीने विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण मोहीम राबवली. पंचायत समितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख व मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या हस्ते मुळा कारखाना परिसरात २५० वृक्षांची लागवड केली.
या मोहिमेत सोनई व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, कृषी महाविद्यालय, सीनियर कॉलेज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. वड, पिंपळ, चिंच, सिम, कडुलिंब या प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी मुळा कारखान्याचे संचालक बापूसाहेब शेटे, मुळा संस्थेचे सहसचिव डॉ. विनायक देशमुख, प्रशासन अधिकारी जालिंदर घुले, डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्यंकटेश बेल्हेकर, आप्पासाहेब शेटे, आप्पासाहेब निमसे, रणजीत जाधव, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी बाफना, उद्योजक महावीर चोपडा, पत्रकार सुनील दरंदले, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. संदीप तांबे, अभिषेक बारहाते, रामनाथ बडे, दत्ता काळे, रमेश पंडित उपस्थित होते.
*एक तरी झाड लावावे…
आषाढी आली की जसे वारकऱ्यांना वारीला जावेसे वाटते, तसे पावसाळा आला की एक तरी झाड लावावे तसेच माजी खासदार यशवंतराव गडाख व माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रेरणेतून प्रत्येक पावसाळ्यात आम्ही यशवंत सामाजिक प्रतिष्ठांनच्या माध्यमातून ठिकठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम राबवित असतो. म्हणून प्रत्येकाने पावसाळ्यात एक तरी झाड लावावे.
– सुनीताताई गडाख, माजी सभापती.


