मुंबई/प्रतिनिधी
साखरेच्या बाजार मुल्याच्या आधारे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मालतारणातील खुल्या साखरेच्या मूल्यांकन दरात ४,७५० रुपये प्रती क्विंटल साखरेचे मुल्याकंन निश्चित करावे अशी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षाना पाठविलेल्या पत्रात साखर संघाने म्हंटले आहे की, मागील तीन महिन्यांचे साखरेचे सरासरी बाजारमुल्य विचारात घेवून बँकेने साखरेचे सुधारित मुल्यांकन दर ४,७५० रुपये करावा अशी विनंती करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत सुधारित मुल्यांकना अभावी एफआरपी पुर्ण करणे अशक्य प्राय होत आहे. याबाबत राज्यातील शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. साखरेच्या बाजार मुल्याच्या आधारे बँकेने तात्काळ ४,७५० रुपये प्रती क्विंटल साखरेचे मुल्याकंन निश्चित करावे अशी मागणी केली आहे.


