Thursday, February 12, 2026

नेवासा तालुक्यातील  जनतेच्या प्रश्नांवर अब्दुल शेख यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर

नेवासा तालुक्यातील गोरगरीब, गरजूवंत, तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्नांवर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व नेवासा विधानसभा सभेचे इछुक उमेदवार अब्दुलभैय्या शेख यांनी मोर्चा नेवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

नगर जिल्ह्यातील शेकडो पीडित कर्जदार यांचे अब्दुल भैय्या शेख यांना साकडे तर जिल्हा अधिकारी यांना फायनान्स कंपनी तक्रार निवेदन.

दि. 10 ऑक्टोबर रोजी नगर जिल्ह्यातील शेकडो पीडित कर्जदार यांच्यावर जो अन्याय होतो त्यांचे प्रश्न घेऊन जिल्हा अधिकारी कार्यल्यावर नेवासा राष्ट्रवादी पक्ष आणि नेवासा तालुक्यातील नेते अब्दुल भैय्या शेख यांनी कर्जदार पीडित शेतकरी, गरीब छोटे मोठे व्यावसायिक यांची फायनान्स कंपनी लूट करीत आहे. दहा लाखाचे कर्ज दिले दहा वर्ष फेड दहा हजार रुपये महिन्याला हफ्ता पंधरा,वीस, तीस, चाळीस वर्ष झाले तरी कर्जदार यांच्यावर मुद्दल कर्ज तसेच दाखवले जाते. एखाद्या कर्ज दाराने दहा वर्ष दहा लाख रुपये कर्ज नियमित थोडे मागे पुढे करुन हफ्ते भरले तरी शिल्लक कर्ज दहा लाख जसेच्या तसें वीस वर्ष भरणा केला तरी कर्ज तसेच या बाबद जिल्हा अधिकारी साहेब यांनी तातडीने फायनान्स कंपनी यांची बैठक घेऊन विचारणा करावी. नगर जिल्ह्यातील शेकडो कर्जदार यांनी या जाचाला कंटाळून आत्महत्त्या केल्या. लोकांचे प्रपंच उजाड होत आहे.

पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कुकाणा येथून नगर कडे जात असताना भैय्या यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी ना दुरुस्त झाली. हाताला पायाला जखम झाली तातडीने उपचार घेऊन हा तरुण लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर कडे रवाना झाला. हजारो बहिणीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे झालेला अपघातात गाडीचे नुकसान झाले पण सुदैवाने त्यांच्या सोबत असणाऱ्या कुणालाही इजा झाली नाहीं.*

शेतकरी यांच्या कापुस पिकाला साडे सात हजार रुपये भाव मिळावा शासनाने ठरवून दिलेल्या हमीभाव तसंच सोयाबीन करिता पाच हजार पाचशे रुपये भाव मिळावा म्हणून शासकीय खरेदी केंद्र चालू करावे अशी जिल्हा अधिकारी यांच्या सोबत चर्चा केली. राष्ट्रवादी चे नेते अजित दादा पवार यांना संपर्क साधून पीडित लोकांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून लक्ष घालावे अशी विनंती केली.

जिल्हा अधिकारी यांनी फायनान्स कंपनी अधिकारी आणि पीडित कर्जदार यांची लवकर बैठक घेऊन मार्ग काढू असे आश्वासन मोर्चातील नागरिक आणि अब्दुल भैय्या शेख यांना दिले.

 

श्री.अब्दुल शेख म्हणाले की, नेवासा तालुक्यातील गोरगरीब, गरजूवंत, तसेच सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित असून सिंगल फेज वीज, चोरांचा सुळसुळाट, रेशन संबंधी माहिती, आधारकार्ड कॅम्प, नवीन मतदार नोंदणी, पिएम किसान योजना, मोफत विमा योजना, मोतीलाल ओस्वाल प्रायव्हेट फायनान्स कंपनी कडून जनतेला होणारी फसवेगीरी, ज्यादा व्याजदर एजंट लोकांचा मनमानी कारभार, तहसील कार्यालयात चाललेला सावळा गोंधळ, तहसील मध्ये एजंट लोकांचा वाढता त्रास, जनतेकडून प्रशासकीय कामांसाठी टक्केवारी घेतली जाते अश्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अब्दुलभैय्या शेख यांनी असंख्य जनते सोबत जिल्हाधीकाऱ्यांना आज निवेदन दिले. लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!