Thursday, February 12, 2026

खडका फाटा टोल नाक्यावर खाजगी प्रवासी बसला आग;प्रवाशी सुखरूप

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील नगर-संभाजीनगर रोडवरील नेवासा पोलीस ठाणे हद्दीतील खडका टोल नाका येथे आज सकाळी पहाटे 5 वाजेच्या सुमारास बस क्रमांक MH-19-Y-3123 या खाजगी प्रवासी बसचा टायर फुटल्याने बसला आग लागलेली आहे.

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचेसह पोलीस घटनास्थळी पोचले आहेत.
बसमधील सर्व प्रवासी खाली उतरवले आहेत. अग्निशमनला बोलावलं असून वाहतूक सुरळीत चालू केली असल्याची माहिती श्री.जाधव यांनी दिली.

ही खाजगी प्रवाशी बस लेलँड कंपनीची क्रमांक HM-19-Y-3123 साईराम ट्रॅव्हल्सची होती.
बसमध्ये 15 प्रवासी पुणे ते जामोद असा प्रवास करीत होते. भेंडा येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखन्याचा अग्निशमन बंब घटना स्थळी दाखल झालेला असुन आग विझविण्यात आली आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!