Wednesday, February 5, 2025

नेवासा प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहिर करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील पत्रकार शंकर नाबदे यांना पत्रकारिता पुरस्कार, राजकिय पटलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सचिन देसरडा यांना सामाजिक पुरस्कार तर विधी तज्ञ स्व.ऍड के.एच. वाखुरे यांना मरणोत्तर समाज भूषण
पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी दिली आहे.

नेवासा येथील औदुंबर चौकात सोमवार दि.६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता या पुरस्कारांचे वितरण कार्यक्रम ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक नेवासकर यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाल ला उपस्थीत राहावे असे आवाहन प्रेस क्लबचे सदस्य अशोक डहाळे, सुधीर चव्हाण, कैलास शिंदे, सूहास देशपांडे, शाम शिंदे, नानासाहेब नाबदे, पवन पठाडे, मकरंद मापारी, रमेश पवार, शंकर गरुड, अभिषेक गाडेकर यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!