Monday, March 30, 2026

जिल्ह्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी जनजागृती अभियान

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर दि.१५

शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी रेशीम शेती उपयुक्त असल्याने जिल्ह्यातील रेशीम शेतीचे क्षेत्र वाढविण्यासाठी जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माहिती रथाला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

रेशीम शेती विकासाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम रथाच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत रेशीम शेतीचा प्रसार करावा, असे आवाहन यावेळी नायब तहसिलदार सुधीर कुलकर्णी यांनी केले.

यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी संदीप आगवणे, क्षेत्र सहायक, व्ही.बी. दळवी, जिल्हा समन्वयक विकास घिगे, राजकुमार पौळ उपस्थित होते.
या अभियानात रेशीम विभागासाठी २५० एकर, कृषी विभागासाठी करीता ३०० एकर व जिल्हा परिषदेसाठी ४०० एकर असा एकुण ९५० एकर नोंदणीचा लक्षांक देण्यात आला असून शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!