Saturday, February 14, 2026

गुहा येथील कानिफनाथ देवस्थान जवळील अनधिकृत अतिक्रमणे हटवा  सोमवारपासून नाथ भक्तांचे तहसील समोर आमरण उपोषण. आमदार राजळेंनी विधानसभेत मांडली लक्षवेधी  

Screenshot 2026-01-05 095857
Screenshot 2026-01-05 095857
previous arrow
next arrow
Shadow

गुहा प्रतिनिधी राहुल कोळसे-राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थान जवळील इनामी शेत जमीन गट नंबर २० ते २४ व २६ ते ३१ यातील सर्व अनाधिकृत असलेले बांधकामे त्वरित काढावे. या मागणीसाठी गुहा येथील नाथ भक्तांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन दिले आहे. तसेच सदरील अतिक्रमण हटवली नाहीतर २४ मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील नाथ भक्तांच्या वतीने देण्यात आला.

कानिफनाथ देवस्थान गुहा येथील या अगोदरही अनाधिकृत बांधकाम काढण्यासाठी २०१६ पासून मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना अनेक वेळा नाथ भक्तांच्या वतीने येथील अनाधिकृत अतिक्रमणे काढण्यासाठीचे निवेदन देण्यात आले होते. मात्र अध्याप हे अतिक्रमणे काढली नसताना नाथ भक्तांच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देऊन अतिक्रमणे काढा अन्यथा २४ मार्च पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला.

यावेळी आबासाहेब कोळसे, किरण कोळसे, मच्छिंद्र कोळसे, ऋषिकेश बांगरे, शशिकेश कोळसे, अँड प्रसाद कोळसे, सचिन कोळसे आदींसह नाथ भक्त उपस्थित होते

[विधानसभेत गुहा येथील इनामी जमीन विषयी लक्षवेधी

दरम्यान आज 21 मार्च रोजी शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील इनामी जमिनी विषयी लक्षवेधी मांडली या लक्ष्मीधी मध्ये राहुरी तालुक्यातील गुहा येथील इनामी जमिनीवर अतिक्रमण झाले आहे या संदर्भात विधानसभेत लक्ष वेधले या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य ती कारवाई करू असे आश्वासन विधानसभेत दिले आहे.]

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!