Thursday, May 21, 2026

कुकाणा विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य पुंजाराम सोनवणे यांचे निधन

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील गोपाळपूर येथील रहिवाशी व कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य पुंजाराम दशरथ सोनवणे (वय ८३ वर्षे) यांचे बुधवार दि.२१ मे रोजी पहाटे ६ वाजता निधन झाले.

कै. सोनवणे यांनी अतिशय कठीण परिस्थितीत स्वतःचे शिक्षण पूर्ण करुन ते शिक्षक बनले. कुकाणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी २५ वर्षे अध्यापन केले. शेवटचे ३ वर्ष विद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी उत्कृष्ट कामही केले. नियत वयोमानाने
२००० मध्ये ते सेवानिवृत्त झाले. नंतर त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा संजीवनी ग्रुप स्थापन करून दर महिन्याला सेवा निवृतांना एकत्र आणत होते. आज पर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी चांगले संस्कार दिलेच त्याचबरोबर स्वतच्या परिवाराला सुद्धा उच्च विभूषित होण्यासाठी प्रेरणा दिली. शिक्षण हाच परिस्थिती बदलण्याचा खरा व योग्य मार्ग असल्याचे त्यांचे ठाम मत होते. वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा हा त्यांचा मोठा गुण होता. गावातही अनेक सामाजिक धार्मिक कामात त्यांचा सहभाग असे. त्यांना स्वाध्याय परिवारची विशेष आवड होती.
त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सुन, नात,नातू असा परिवार आहे. नेवासा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब सोनवणे यांचे वडिल होत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!