Tuesday, March 31, 2026

गोमास विक्री करणाऱ्या महिलेवर नेवासा पोलिसांची कारवाई

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील सलबतपुर येथे गोमास विक्री करणाऱ्या महिलेवर नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रानी या बाबद दिलेल्या अधिक माहिती नुसार दि. ३० रोजी पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक
संतोष खाडे यांना त्यांचे गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे सलबतपुर ता. नेवासा येथील कुरेशी मोहल्यात गोमास विक्री होत आहे.
अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने प्रभारी अधिकारी नेवासा यांनी तात्काळ पोलीस स्टाफ यांना सदर माहितीचा थोडक्यात आशय सांगून रवाना केले. सदर पोलीस स्टाफ व पंच असे कुरेशी मोहल्ला, सलबतपुर या ठिकाणी गेले असता तेथे एक बाई खाली बसून तिचे समोर दोन-तीन इसम उभे असल्याचे दिसले. सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता सदर बाई गोमास विक्री करत असल्याचे आढळून आल्याने सदर बाईस तिचे नाव गाव विचारले असता तिने तिचे नाव रियानबी यासीन शेख (वय 52 वर्ष) रा. सलबतपुर, ता. नेवासा असे सांगितले. सदर महिलेचे महिला पोलीस व महिला पोलीस पाटील यांचे समक्ष झडती घेतली असता तिचे अंदाजे ६ हजार ५०० रुपये किमतीचे गोमास मिळून आले.
सदर गोमास पंचासमक्ष जप्त करून सदर महिला विरुद्ध पोलीस ठाणे नेवासा येथे प्रचलित कायद्यान्वये महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर विभाग
वैभव कुलबर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव सुनील पाटील यांचे मार्गदर्शना खाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री संतोष खाडे, परिविक्षादिन पोलीस उपअधीक्षक, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल आप्पा तांबे, श्रीनाथ गवळी, अवि वैद्य, गणेश जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती पवार, पोलीस पाटील रजिया शेख यांनी सदरची कामगिरी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!