Tuesday, December 30, 2025

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या मोठी संघटना-संजय बनसोडे

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही समाजातील अनेक घटकांचा लोकआधार लाभलेली गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या मोठी असलेली संघटना असल्याचे प्रतिपादन
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे कॉ.बाबा आरगडे यांच्या निवासस्थानी मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी दुपारी नेवासा तालुक्यातील शाखा भेटी दौऱ्या दरम्यान झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना राज्य कार्याध्यक्ष श्री.संजय बनसोडे बोलत होते.
राज्य सल्लागार कॉ.बाबा आरगडे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
राज्य प्रधान सचिव अड.रंजनाताई गवांदे,जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब बुधवंत,जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू गायकवाड,जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा,जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सुखदेव फुलारी, बुवाबाजी संघर्ष विभाग जिल्हा कार्यवाह शशिकांत गायकवाड,विविध उपक्रम विभाग जिल्हा कार्यवाह बी.के.चव्हाण,अमृत काळे, नेवासा शाखा उपाध्यक्ष बाळासाहेब आरगडे, भाऊसाहेब सावंत, भाऊसाहेब गोर्डे,
सरपंच शरद आरगडे,संजय आरगडे,सुधाकर नवथर,नानासाहेब खराडे,सुर्यकला आरगडे,प्रियंका आरगडे,
क्रांति आरगडे, संग्राम आरगडे, आदि यावेळी उपस्थित होते.

श्री.बनसोडे पुढे म्हणाले की,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कामाचे स्वरूप वाढत आहे. चळवळीला ३६ वर्षे पूर्ण आहे. राज्यभर ३६ जिल्ह्यांतून ३७५ हून अधिक शाखा असून पत्रिकेचे ७ हजाराहून अधिक सभासद आहे.संघटना स्थिरावली असली तरी सध्याची सामाजिक-राजकीय परिस्थिती संघटनेसाठी प्रतिकुल आहे. धर्मांध शक्ति विरुद्ध संघर्षची वेळ आहे.परंतु प्रतिकुल परिस्थितीमध्येच
खरे काम करता येते.समाज दबलेला-पिचलेला असेल तरच चळवळी मोठ्या होतात.प्रबोधन, कृती आणि संघर्ष या पातळी आपले काम सूरु आहे.डॉ.नरेंद्र दाभोलकर ,कॉ.गोविंदराव पानसरे,कॉ.बाबा आरगडे यांच्या सारख्या समर्पित भावनेने काम करणाऱ्या व्यक्तिपासून प्रेरणा घेत प्रश्न विचारणारी संस्कृति निर्माण करणे, समाजात विवेकवाद रुजविण्याचे व बुवाबाजीला विरोध करण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

राज्य प्रधान सचिव अड.रंजना गवांदे म्हणाल्या,नवीन सभासद नोंदणी करणे,शाखा कार्यकारी पदाधिकारी निवडी करणे,चळवळीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे सभासद वाढविणे,तरुण कार्यकर्ते जोडणे,महिलांचा सहभाग वाढविणे हा शाखा भेटी मागचा उद्देश आहे.

जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत, शरद आरगडे, विष्णु गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.भाऊसाहेब सावंत यांनी प्रस्ताविक केले. बाळासाहेब आरगडे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!