पत्रकार राहुल कोळसे:ज्ञानवर्धिनी सेंट्रल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, CBSE, गुहा ता. राहुरी जि. अहिल्यानगर या विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत सलग सहाव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.यावर्षी इयत्ता दहावीमध्ये एकूण 43 विद्यार्थी शिक्षण घेत होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
या निकालामध्ये आदिती पाटील हिने 92.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. यश विक्रम जाधव याने 89.40 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला, तर आरुष राठी याने 87.80 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. अरुण पारखे, श्री औदुंबर कडू, श्री चंद्रकांत कदम, श्रीमती अलका कोळसे, राजश्री भांड, दिपाली खरडे, सुजाता कोळसे, शितल जाधव, सौरभ वरखडे, नामुअल रायता, जयश्री पागिरे, गीतांजली डोंगरे, रवींद्र गागरे, केतकी ईश्वरकर, स्वाती कदम, विकास सौदागर, नामदेव कोळसे, सोमनाथ नरोडे आदी शिक्षकांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक श्री ज्ञानदेव शेलार व सचिव सौ. मनीषा शेलार यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


