Wednesday, September 16, 2026

वारकरी व शेतकरी एकत्र आणण्याची परंपरा ज्ञानेश्वर उद्योग समूहाने जपली-उद्धव महाराज मंडलिक

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ‘वारकरी व शेतकरी’ यांना एकत्र आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती जपली, असे प्रतिपादन नेवासा येथील श्रीसद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत गुरुवर्य उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता श्रीसंत नागेबाबा भक्त निवासमध्ये आयोजित कार्यक्रमात उद्धव महाराज मंडलीक बोलत होते.
कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील,
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग, अड.देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले,  संचालक पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ,दत्तात्रय काळे, डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख,अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे, जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड, काशिनाथ नवले, कॉ.सुभाष लांडे, कॉ.बंशी सातपुते, रवींद्र नवले, तुकाराम मिसाळ,सुदाम महाराज शास्री,शेतकरी नेते अंबादास कोरडे,निवृत्ती दातीर, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, जनरल मॅनेजर रविंद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर माऊली व लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच ऊस शेती मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना श्री ज्ञानेश्वर ऊस उत्पादकता पुरस्काराने  गौरविण्यात आले.

महंत उद्धव महाराज पुढे म्हणाले की,
वैकुंठवासी बंशी महाराज तांबे यांचे सूचने वरून घुले पाटील साहेबांनी या साखर कारखान्याला माऊलींचे नाव दिले.
वारकरी संप्रदायातील संत-महंतांना बोलावून कार्यक्रमात आवर्जून सहभागी करून घेण्याची परंपरा स्व.घुले पाटील यांनी सूरु केली तीच परंपरा ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी देखील आजही सुरु ठेवली आहे, त्याबद्दल उदयोग समूहाचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
दुष्काळाचे संभाव्य संकट आपल्या समोर आहे,त्यामुळे शेती बरोबरच घरातील व्यवस्थापन ही काटकसरीने करावे लागेल. ‘पाणी आणि पैसा’ ही जपून वापरावा लागेल. जीवनात धोके निर्माण होण्यापूर्वी चिंतन केले तर
पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. चिंतेत जायचे नाही तर चिंतनातून मार्ग काढायचा हे संत परंपरेने आपल्याला शिकविलेले आहे.कोणत्याही क्षेत्रात हळूहळू प्रगती होत असते, त्यासाठी धीर धरावा लागतो. ज्ञानेश्वर उद्योग समूहाची मोठ्या उमेदीने वाटचाल सुरु असून त्यास सर्वांनी साथ व पाठबळ दयावे.

*शासनाने साखर उतारा घट अनुदान दयावे-नरेंद्र घुले पाटील*

अध्यक्षस्थानावरून बोलतांना श्री.नरेंद्र घुले पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती आहे.एकरी ऊस उत्पादनामध्ये तसेच साखर उत्पादनामध्ये घट होणार आहे त्यामुळे शासनाने साखर उतारा घट अनुदान दयावे. तसेच शेतीला पूर्णवेळ विज देता येत नसेल तर वीजबील व शेतीकर्ज माफ करावे,चारा तगाई द्यावी. जायकवाडी व मुळा धरण पाण्यावर परिसरातील शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी शेतकरी बांधवांना पाईप लाईनसाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. श्रमाला प्रतिष्ठा देणारा आणि मनोबल ऊंचवीणारा हा आजचा कार्यक्रम आहे. शेतकरी बांधवांनी प्रतिकुल परिस्थितीत योग्य नियोजन करत जास्तीत जास्त ऊस उत्पादनाचे नियोजन करावे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी हंगाम यशस्वीपणे पूर्ण करू.

*सरकारने ऊसाला प्रतिटन ५०० रुपये अनुदान द्यावे-पांडुरंग अभंग*

माजी आ.पांडुरंग अंभग म्हणाले की,
दुष्काळी परिस्थिती मुळे ऊसाची
पुरेशी वाढ झालेली नाही,त्यातच हुमणी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने
एकरी ऊस उत्पादन कमी होऊन साखर उताऱ्यात एक ते दीड टक्का घट येणार आहे, त्यामुळे शासनाने ऊसाला प्रतिटन ५०० रुपये अनुदान दयावे अशी मागणी केली.

जनार्दन पटारे, अरुण लांडे, सुधाकर लांडे, रामजी आंधळे, दादासाहेब गंडाळ,सखाराम लव्हाळे, विष्णूपंत जगदाळे, बाळासाहेब मरकड, रामभाऊ जगताप, भावराव भोंगळे, अजित मुरकुटे, डॉ.शिवाजी शिंदे, अशोक वायकर,राजेंद्र चिंधे,डॉ. संतोष फुलारी, सोपान महापूर, वैभव नवले, भाऊसाहेब आगळे, शिवाजीराव गवळी, मारुतराव घुले  पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, कामगार संचालक सुखदेव फुलारी,कामगार संघटनेचे सचिव संभाजीराव माळवदे, अड.बाळासाहेब शिंदे,भानुदास कावरे, अंबादास कळमकर, हरिभाऊ नवले, कुमार नवले,भारत गुंजाळ,अड.रविंद्र गव्हाणे, अनिल मडके,ताहिर पटेल, बाबासाहेब लांडे, हनुमान पातकळ,मंगेश थोरात, कुंडलीक घोरताळे,विजयराव देशमुख, आशुतोष डहाळे,सुनिल काकडे, बाजीराव मुंगसे, कारभारी चेडे,लक्ष्मण बनसोडे,बबन भानगुडे,शरद वाकचौरे, हुकुमबाबा नवले, राजू परसय्या, ज्ञानदेव दहातोंडे, दत्तात्रय खाटीक,संजय कर्डिले, राजेंद्र पाटील,दत्तात्रय विधाटे,संभाजी ठाणगे, भावराव आगळे,आदि उपस्थित होते.

कारखान्याचे उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक अशोकराव मिसाळ यांनी आभार मानले.

*श्री ज्ञानेश्वर उस उत्पादक पुरस्काराचे मानकरी…*
सौ.चौधरी लताबाई भाऊसाहेब,माळी चिंचोरा,ता.नेवासा(आडसाली ऊस ८६०३२ एकरी ७४ मे टन), दहातोंडे संजय पाराजी,चांदा, ता.नेवासा (खोडवा ऊस २६५ एकरी ७२ मे टन),भोईटे एकनाथ रामचंद्र, भानसहिवरा, ता.नेवासा(खोडवा ऊस २६५ एकरी ७८ मे टन),सौ.साळवे सुनीता भागचंद,मक्तापूर, ता.नेवासा(आडसाली ऊस २६५ एकरी १०१ मे टन),सौ.डोईफोडे कडूबाई विजय, रांजनगांव, ता.नेवासा (आडसाली ऊस ८६०३२ एकरी ८५ मे टन),निकम अंबादास काशिनाथ, देवगाव, ता.नेवासा(आडसाली ऊस ८६०३२ एकरी ११४ मे टन),शिंदे सुनील जगन्नाथ,मंगळापुर, ता.नेवासा (खोडवा ऊस २६५ एकरी ६२ मे टन),
नरोडे रवींद्र शांतवन,मंगळापुर, ता.नेवासा(खोडवा ऊस २६५ एकरी ६२ मे टन),रिंधे दिगंबर प्रल्हाद,जेऊर, ता.नेवासा(आडसाली ऊस २६५ एकरी १३० मे टन),कचरे संजय निवृत्ती,कुकाणा, ता.नेवासा (पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ८७ मे टन),
शिंदे अरुण बाबासाहेब,गोपाळपूर, ता.नेवासा (पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ७५ मे टन),सौ.गोरे मिराबाई आसाराम,रामडोह, ता.नेवासा (खोडवा ऊस २६५ एकरी ८० मे टन),सौ. पुंड मुक्ताबाई सिताराम,तरवडी, ता.नेवासा (आडसाली ऊस ८६०३२ एकरी ७४ मे टन),क्षीरसागर शरद ज्ञानदेव,तरवडी, ता.नेवासा (खोडवा ऊस २६५ एकरी ७५ मे टन),शित्रे गणपत मोहन,ढोरसडे,ता.शेवगाव
(पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ७५ मे टन),जमधडे वैभव पांडुरंग,भातकुडगाव, ता.शेवगाव (खोडवा ऊस २६५ एकरी ६८ मे टन),
गाढे काकासाहेब बाबासाहेब, आखादवाडे, ता.शेवगांव(आडसाली ऊस २६५ एकरी ९० मे टन),गरड आदिनाथ मच्छिंद्र,ढोरजळगाव, ता.शेवगाव (खोडवा ऊस २६५ एकरी ७९ मे टन),सौ.नजन रुक्मिणी प्रभाकर,खुटेफळ, ता.शेवगाव (पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ७४ मे टन),
शिंदे भास्करराव रामभाऊ,दहिफळ, ता.शेवगाव (पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ६४ मे टन),वावरे मधुकर गेनुजी,वरुर बुद्रुक, ता.शेवगाव (पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ७० मे टन),
बाहेती ओमप्रकाश रामनारायण, एरंडगाव, ता.शेवगाव(सुरू ऊस २६५ एकरी ५९ मे टन),राजेभोसले चंद्रसेन मल्हारराव,मुंगी, ता.शेवगाव (आडसाली ऊस २६५ एकरी ८० मे टन),गव्हाणे अमोल सुधाकर,मुंगी, ता.शेवगाव (पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ७६ मे टन),गलांडे रामेश्वर मोहन,हादगाव, ता.शेवगाव (सुरू ऊस २६५ एकरी ५३ मे टन),ढेसले गोवर्धन विष्णू,बोधेगाव, ता.शेवगाव (खोडवा ऊस २६५ एकरी ५१ मे टन),लोखंडे बाळासाहेब जनार्धन, सुलतानपूर बुद्रुक, ता.शेवगाव (सुरू ऊस २६५ एकरी ५२ मे टन),जाधव माणिक भानुदास, भावीनिमगाव, ता.शेवगाव (पूर्व हंगामी ऊस २६५ एकरी ७८ मे टन),पवार संभाजी मोहनीराज,नेवासा खुर्द, ता.नेवासा( १००० मे टन ऊस पुरवठा),बडधे राजेंद्र त्रिंबक,शेवगाव,ता.शेवगाव (९६६ मे.टन ऊस पुरवठा),सौ.म्हस्के शकुंतला शिवाजी,जेऊर, ता.नेवासा(७३७ मे टन ऊस पुरवठा),घुले अभिजीत नानासाहेब,रांजणी, ता.शेवगाव (ऊस व इतर पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर),काळे रवींद्र आबासाहेब,तेलकुडगाव, ता.नेवासा (ऊस व इतर पिकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर),चावरे विकास रोहिदास,जळके बु,ता.नेवासा (ऊस रोप वाटिके व्दारे सुधारीत जातींचे ऊस बेणे पुरवठा)

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!