Saturday, June 22, 2024

महिलांसाठी असुरक्षित असलेल्या देशांत भारत अग्रगणी-डॉ.प्राजक्ता कुलकर्णी

IMG-20240425-WA0005
IMG-20240620-WA0001
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/सुखदेव फुलारी

आकडेवारी असं सांगते की १९९७ पासून २००५ पर्यंत ५० टक्के इतकी वाढ झाली होती. देह व्यापारामध्ये आणि आत्ता ३ दशलक्ष इतक्या महिला देह व्यापारामध्ये आहेत आणि त्यातल्या ३८% मुली आहे. त्या अल्पवयीन आहेत. आमची उडान नावाची हेल्पलाइन चालते आणि महिन्याला जवळजवळ दीडशे मुलींचे फोन कॉल्स येतात. कारण त्यांचे १८ वर्षाच्या आधी लग्न होणार असतात हे महिन्याची आकडेवारी आहे आणि जे समोर येत नाही ते कितीतरी प्रकरण आहे.आजही दर पाच मिनिटाला एक मूल लैंगिक अत्याचारांना बळी पडतं. आजही भारत हा महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमधला अग्रगणी देश आहे असे परखड मत स्नेहालयाच्या संचालिका डॉ.प्राजक्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

नेवासा तालुक्यातील सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठान  वतीने शिंगवे येथील माउली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे, अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेचे डॉ. प्राची व डॉ. गिरीश कुलकर्णी, तसेच मोहाडी येथील सह्याद्री एकात्मिक प्रकल्पाचे अध्यक्ष विलास शिंदे यांना रवीवार दि.२१ जानेवारी २०२४ रोजी कृतज्ञता पुरस्काराने जेष्ठ नेते माजी खा यशवंतराव गडाख यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

डॉ. प्राजक्ता कुलकर्णी पुढे म्हणाल्या की,
गेल्या ३० वर्षाचा धांडोळा घेत होतं आणि मग मला एक वाक्य आठवलं जेव्हा आवडतं वाक्य आहे स्नेहालयात शिरल्यावर त्याच्या समोरच्या भिंतीवर लिहिले गेलेले अनेक वर्षापासून एक वाक्य लिहिलेला आहे की “स्नेहालय हे भूषण नाही स्नेहालय हे प्रायचित्त आहे” हे प्रायश्चित्त घेत असल्याला आता तीस वर्षे झाली आहेत आणि तीस वर्षाच्या या प्रायश्चिता मध्ये स्नेहालय ह्या लोक चळवळीने नेमकं काय साध्य केलं याचा हा धांडोळा घेत आमचा दीर्घ परिचय करून दिला आत्ता आणि मला असं वाटतं माझं मनोगत म्हणून मी थोडक्यात व्यक्त करावं आणि गेल्या ३० वर्षाच्या लोक चळवळीची फलप्राप्ती अशी आहे की १९९७ साली लालबत्ती विभागातल्या महिला आणि मुलांसाठी हे संस्था सुरू झाली होती आणि पुढे त्याचा रूपांतर भारतातल्या सगळ्यात मोठ्या आणि पहिल्या एचआयव्ही बाधित मुलांच्या आणि महिलांच्या निवासी प्रकल्पामध्ये झाला आणि ही घटना नगर जिल्ह्यामध्ये घडली याचा मला विलक्षण अप्रूप वाटतं कारण नगर जिल्ह्याला लोकसळमळींचा इतिहास आहे गेल्या ३० वर्षांमध्ये काय काय झालं गेल्या ३० वर्षांमध्ये एचआयव्हीचा जो दर होता ९७ साली डॉक्टरांनी आता आपल्याला सांगितलं उल्लेख झाला की याच्या भस्मासुर सगळीकडे पसरत होता आणि एचआयव्ही म्हणलं की त्या माणसांशी बोलायला देखील कोणी तयार नसायचं त्या एचआयव्ही बाधित महिलांचं प्रमाण नगर मधल्या लालबत्ती विभागामध्ये आता जवळजवळ दोन टक्के वर आलेला आहे याला कारणीभूत स्नेहालयाची चळवळ होती गुप्तरोगांचे प्रमाण शून्य टक्के आहे जे मोठ्या प्रमाणात होतं आता उल्लेख झाला की जगातल्या वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये स्नेहालयाचा तिसरा क्रमांक आहे आज सहा मोठ्या स्लम्स मध्ये काम करतो नगर जिल्ह्यामध्ये आणि सगळी छोटी मुलं शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलेली आहे सामाजिक प्रश्नांच्या विविध अंगांना स्पर्श करण्यासाठी त्याच्यावर काम करण्यासाठी २७ प्रकल्प सुरू आहेत. आणि हे सगळं काम करण्यासाठी स्नेहालयाची दुसरी पिढी काम करते आणि जवळजवळ ३००० कार्यकर्त्यांचं जाळं आज स्नेहाच्या रुपाने काम करत आहे. आम्ही फक्त त्याचे दिसणारे चेहरे आहोत. आपल्या सगळ्यांची कृतज्ञता मी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने पण व्यक्त करते आणि मला असं स्वतःला वाटतं की अशा प्रकारची पुरस्कार जेव्हा मिळतात तेव्हा एक प्रकारे हा सिंहालोकनाचा क्षण असतो की, आत्ता आपण आत्तापर्यंत आपण काय काम केलेलं आहे आणि ते मनाशी त्याची खूणगाठ पक्की करत असताना अजून एक खूणगाठ बांधली जाते की माझ्याकडून काय राहिलेलं आहे. आणि हे काय राहिलेलं आहे ते बघताना मोठा भीषण चित्रात समोर येतंय. कारण गेल्या अनेक वर्ष मी लहान मुलांबरोबर काम करते, दत्तक विधानाच्या क्षेत्रामध्ये काम करते आणि दत्तक विधानाच्या क्षेत्र मध्ये काम करत असताना खूप अनाथ मुलं सोडून दिलेली मुलं,परीतक्ता बायका, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या बायका, खूप व्यथा आणि विवांचना असणारे पुरुष या सगळ्या घटकाना मी आहेत. या सगळ्या घटकांचा माझा जवळून परिचय झालेला आहे आणि मला खेदानी सांगावसं वाटतं की आजही ऍडॉप्शन मध्ये काम करत असताना अनाथ मुलांवर काम करत असताना एक मोठी वेटिंग लिस्ट आहे. ज्याच्यामध्ये जवळजवळ २५ हजार पालक प्रतीक्षेत आहेत की, त्यांच्या घरी मूल याव. ही प्रतीक्षा यादी ३ वर्षांची आहे,भारतातील अनाथ मुलांची संख्या २ दलक्ष आहे.आणि ही मूल दत्तकाच्या प्रवाहामध्ये येत नाही त्याचा अर्थ त्यांना कुटुंब आजही मिळालेला नाही.
मुळामध्ये रेड लाईट एरियामध्ये स्नेहालयाचं काम सुरू झालं होतं आणि नगर जिल्ह्यामध्ये आता कुणीही दुसऱ्या पिढीच्या वेश्या व्यवसायामध्ये नाही.
हा चमत्कार स्नेहलयाने केलेला असला तरी भारताची संख्या मात्र व्यस्त आहे. आकडेवारी असं सांगते की १९९७ पासून २००५ पर्यंत ५० टक्के इतकी वाढ झाली होती. देह व्यापारामध्ये आणि आत्ता ३ दशलक्ष इतक्या महिला देह व्यापारामध्ये आहेत आणि त्यातल्या ३८% मुली आहे. त्या अल्पवयीन आहेत. आमची उडान नावाची हेल्पलाइन चालते आणि महिन्याला जवळजवळ दीडशे मुलींचे फोन कॉल्स येतात. कारण त्यांचे १८ वर्षाच्या आधी लग्न होणार असतात हे महिन्याची आकडेवारी आहे आणि जे समोर येत नाही ते कितीतरी प्रकरण आहे.आजही दर पाच मिनिटाला एक मूल लैंगिक अत्याचारांना बळी पडतं. आजही भारत हा महिलांसाठी सगळ्यात असुरक्षित असलेल्या देशांमधला अग्रगणी देश आहे. हे माझं मनोगतच आहे आणि हे मनाशी बोलत असताना मला याची जाणीव होतीये की किती काम अजून करायचं राहिले आणि हे तुमच्या सगळ्यांच्या पाठबळाशिवाय शक्य नाहीये. तुम्ही आज हा पुरस्कार देऊन आम्हाला एक ठसठशी जाणीव करून दिली आहे की अजून खूप काम करायचे आणि तुमच्या ह्या शाब्बासकीच्या, तुम्ही आमच्या पाठीवर दिली आहे त्याचं खूप अप्रूफ आम्हाला म्हणूनच वाटतय कारण त्यामुळे आमचं बळ वाढणार आहे.

*विलास शिंदे…*
सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे प्रमुख
विलास शिंदे म्हणाले की,एका दान्याचे हजार दाणे होतात असं म्हणायला सोपं आहे, तसे असेल तर शेतकऱ्या इतका संपन्न माणूस कोणी नसेल. जर निसर्ग नियमाप्रमाणे झालं मनानं ठीक आहे त्या चारच महिन्यात एका दाण्याचे हजार झाले म्हणजे हजार पट नफा झाला म्हणजे शेतकरी इतका कोणी तर श्रीमंत माणूस नसेल.मात्र शेतीची गंमत फुटक्या पाईप लाईन सारखी गोष्ट आहे,कीती ही पाणी टाका पुढे जातच नाही.त्यात अनेक गळत्या आहेत. प्रत्यक्षात शेतीचे काही उत्पन्न निसर्गाच्या फटक्याने जातात, कधी काही मार्केटमधल्या काही इतर घटकांमुळे तर कधी सरकारच्या धोरणामुळे जातं.जर शेतकरी सुखी व्हायचा असेल ,ग्रामीण भारत-महाराष्ट्र बदलायाचा असेल तर तो शेतीमधूनच बदलेल.मागच्या बारा वर्षांमध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत जो काही प्रवास झालेला आहेत त्या प्रवासाच्या वाटेवर बरेच काही अनुभव तयार झाले आहेत आणि त्याचबरोबर जे काही थोडेफार यश येत आहेत त्याच्या निमित्ताने बरेच काही पुरस्कारही वाटले यायला लागलेत. पण सर्व पुरस्कारामध्ये आजचा यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुरस्कार एक वेगळा पुरस्कार आहे, आजचा हा कृतज्ञता पुरस्कार मिळाला हा एक वेगळे समाधान मला वाटतंय कारण ज्यांच्या नावाने यशवंत प्रतिष्ठान आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालतो आहे ते माननीय श्री यशवंतरावजी गडाख साहेब त्यांचा आयुष्य हेच आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा आहेत.
मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मी 91 तो 95 ते चार वर्ष कृषी अभियांत्रिकी डिग्री त्यानंतर दोन वर्ष एमटेक डिग्री असे सहा वर्षे राहुरी कृषी विद्यापीठात होतो आणि त्या निमित्ताने इथे जे काही चाललेल आहे मी नगर जिल्ह्यात सर्वच एकंदरीत सर्व ऊस कारखानदारी पासून तर दूध व्यवसाय पासून हे सगळं कृषी औद्योगिक जी व्यवस्था यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये ग्रामीण भागात बदल होण्यासाठी सुरुवात झाली त्याची सगळी पायाभरणी किंवा सर्व चित्र आम्ही सर्व विद्यार्थी तसेच असतानाच बघत होतो.आमच्या कुटुंबात वडील आणि पाच काका म्हणजे सहा भावांचं कुटुंब आणि पूर्णपणे शेतीवर अवलंबून. शेती शिवाय काही उत्पन्न नाही. मी साधारण सहा वर्षाचा असताना नाशिक जिल्ह्यामध्ये जे पहिलं आंदोलन शेतकरी संघटनेचे झालं कांदा आंदोलन कांदा व उसाचे आंदोलन
पहिले. त्या आंदोलनाच्या निमित्ताने जो सहा दिवस आग्रा रोड अडवलेला होता आणि तो हायवे जो अडवलेला होता तेव्हा शरद जोशी नदी अटक झाली ती आमच्या गावात आडगाव मध्ये झालेली होती. शेती विषयात कीती गुंतागुंत आणि समस्या आहेत त्यावेळी कळले.
शेतात घरातली सर्व मंडळी त्यात खास करून सर्व महिला म्हणजे आई,आमच्या सगळ्या काकू मी सकाळी चार ते रात्री १० वाजे पर्यंत घरात आणि शेतात राबत होत्या. अशा परिस्थितीत शेतकरी संघटनेमार्फत जी एक घोषणा दिली जायची “भीक नको हवे कामाचे दाम” आम्हाला कोणाची भीक नको आम्हाला कोणाचं उपकार नकोय आम्हाला फक्त आमच्या कामाचे दाम हवे.
आपल्या शेतीच्या उत्पन्नातून आपलं घर चालले पाहिजेत म्हणून आपली शेती करायची आहे, प्रत्यक्ष जेव्हा शेती करायला लागलो तेव्हा लक्षात यायला लागलं की कल्पना मांडला खूप छान आहेत,आदर्श बोलणं खूप छान आहेत व प्रत्यक्षात तसे नसते तुमचं ज्ञान विद्यापीठातलं पुस्तके ज्ञान आहेत प्रत्यक्षात गेल्यानंतर लक्ष देत काही किती फसव आहे. पुढच्या अनुभवातून ते लक्ष येत गेलं की जे काही शानपण, ज्ञान असतं ते अनुभवातून येत ते खरं शहाणपण, ते खरं ज्ञान. वाचन खूप छान केलं खूप छान तुम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला ज्ञान आलं असं काही नसतं. खर ज्ञान प्रत्यक्ष शेतीमध्ये गेल्यावर कळायला लागलं. शेतीमध्ये वेगवेगळ्या अनुभवाचा जवळजवळ आठ वर्ष मी बबरेच सगळे प्रयोग केले. विद्यापीठात काय शिकलो असेल ते सगळं तिथे प्रत्यक्ष फिल्डवर अल्पाय करायचा प्रयत्न केला. पिक बदल करून पाहिले. मार्केटमध्ये वेळोवेळी प्रयोग करायचे प्रयत्न झाले आहेत.जोड व्यवसाय करायचं झालं, सगळं झालं म्हणजे सगळे जे काही सल्ला म्हणून एका शेतकऱ्याला दिले जातात ते.

आपला माल जगातल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत कसं घेऊन जाता येईल ते हे सगळं सूत्र जे शरद जोशींनी मांडन्याचा प्रयत्न केला होता ते प्रत्यक्षात आणायचं काम सह्याद्रीच्या वतीने सुरुवात झाली.प्रत्येक पिकांमध्ये सह्याद्री नंबर वन वर पोहोचले. द्राक्षामध्ये घ्याल तर सह्याद्री जवळजवळ पूर्ण भारतातून जेवढा होतो त्याच्याजवळपास 18% सह्याद्री प्रोड्यूस करतात, आमच्या आधी पहिला नंबर महिंद्रा सारखी कंपनी होती तिला मागे टाकून सह्याद्री पुढे गेली. ही १००% शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली कंपनी कंपनी कारपोर्टला मागे टाकून पुढे गेलेत. टोमॅटोमध्ये त्याच पद्धतीने नंतर जेव्हा आम्ही टोमॅटो पिकाच विषय आधी घेतलात तर टोमॅटो सगळ्या आमच्या सोबत पातळीवर तरी आम्ही प्रश्न सोडवलात तर भाव पडतील तेव्हा कमीत कमी मिनिमम एक हमीभाव आणि जेव्हा संधी तेव्हा जास्तीत जास्त भाव या प्रक्रियेमध्ये सह्याद्रीचे टोमॅटो प्रक्रिया खूप मोठी झाली. देशातली सगळ्यात जास्त प्रक्रिया टोमॅटोची होत असेल तर सह्याद्री मध्ये होते. दिवसाला १००० टन टोमॅटो सह्याद्रीमध्ये प्रोसेस होतात. संत्रा मध्ये आज सह्याद्री तसेच पद्धतीने सगळ्यात पुढे लीडिंग प्रोसेसर म्हणून आज महाराष्ट्रातले मुख्य जे काही फळ पिकं आहेत द्राक्ष डाळिंब केळी, आंबा संत्री हे पाच मुख्य पीक त्याचबरोबर महत्त्वाचे जे काही भाजीपाला पीक आहेत त्याच्यामुळे टोमॅटो एक आणि दुसरा आणि त्या शिवाय आठ पिकांची यंत्रणा जस आज इथे उसाची यंत्रणा आहे किंवा दूधच यंत्रणा आहे तशी ते आठ पिकांची यंत्रणा आमच्या शेतकऱ्यांसाठी सह्याद्रीच्या माध्यमातून उभी रात गेले आणि आज जवळजवळ आजच्या मिनिटाला एक २० हजार शेतकऱ्यांचा हा एकत्रीचा प्रवास आहे. या प्रवासात म्हणजे आता खरं म्हटलं तर फक्त पायाभरणी झालेली आहे. अजून खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत. एक फक्त एक वेगळा १४ वर्षाचे प्रवासामध्ये एक अनुभव जे तयार झाले तर प्रश्न जे आहेत,ते प्रश्न सोडवण्यासाठी वरून कोणी पुढाकार घेणार नाही. दिल्लीतून मुंबईतून किंवा वरून ते वाशिंग्टन म्हणून काही घडणार नाही.
होईल तर खालच्या मातीतून होईल, गावातून होईल, गावातल्या लोकांच्या क्षमतेतूनच होईल. आणि फक्त तो आत्मविश्वास आपल्यामध्ये होण्याची गरज आहे. शेती व्यवसाय इतका समृद्ध व्यवसाय नाही. ग्रामीण महाराष्ट्र बदलायचं असेल ग्रामीण भारत बदलायचं असेल तर शेतीमधूनच तो बदलेल.

डॉ.गिरीश कुलकर्णी म्हणाले,
जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारी यशवंत प्रतिष्ठान संस्थेने केलेला सन्मान उर्जादायी आहे, असे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले. स्नेहालय संस्थेच्या माध्यमातून वंचित घटक, बालके यासाठी काम केले जाते यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले परंतु सामाजिक कार्यात मला नेहमी साथ देणाऱ्या पत्नीसह प्रथमच पुरस्कार दिला आहे हे मानला आनंद देणारे व समाजकार्याची जबादारी वाढवणारे असेच आहे. यशवंत प्रतिष्ठान राबवत असलेली मरणोत्तर नेत्रदान चळवळ ही अंधांच्या जीवनात प्रकाश फुलवणारी आहे. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्याशी असलेल्या जुन्या स्नेहाला उजाळा दिला व त्यांनी केलेल्या मदतीमुळेच स्नेहालयचे काम
जगभर पोहचू शकले, असे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले. आपल्यापेक्षा मोठे काम कुणीतरी ग्रामीण भागात करते आहे ही भावना मनाला आनंद देऊन गेली असल्याचे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले व प्रशांत गडाख यांनी अमाप प्रेम संस्थेला केलेल्या मदतीचीही त्यांनी आठवण काढली.

आ.शंकरराव गड़ाख प्रास्ताविक करताना म्हणाले की,’तरुणाई समाजासाठी’ हे ब्रीद घेऊन विविध क्षेत्रांत समाजउभारणीचे काम करणाऱ्या आयडॉल यांचा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान करण्यात येतो. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आमदार शंकरराव गडाख यांनी केले. प्रतिष्ठान राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तालुक्यातील नागरिकांना विचारांची पर्वणी लाभावी व नवीन काही तरी आत्मसात करता यावे तसेच समाजासाठी काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान व्हावा या भावनेने कृतज्ञता पुरस्काराचे आयोजन केले जाते असे म्हणाले व उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.

डॉ. राजेंद्र धामणे व डॉ. सुचेता धामणे बाहेरगावी असल्याने कार्यक्रमास पोहचू शकले नाही. त्यांचा सन्मान माऊली सेवा प्रतिष्ठान नांदगाव येथे जाऊन केला जाणार असल्याचे प्रतिष्ठानच्यावतीने सांगण्यात आले. प्रतिष्ठानच्या मरणोत्तर नेत्रदान उपक्रमात नेत्रदान केल्याबद्दल नेत्रदात्यांचे वारसदार गोवर्धन रोडे, संजय गडाख यांचा विलास शिंदे व डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार पांडुरंग अभंग, साहेबराव घाडगे, दिलीपराव लांडे, डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, अरुण शेवते, द. वी. अत्रे, विश्वासराव गडाख, विजयराव गडाख, सुनीलराव गडाख, माजी सभापती सुनीताताई गडाख, दुर्वा प्रशांत गडाख, भूषण देशमुख, भरत कुलकर्णी आदींसह नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातून मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सुभाष देवढे पाटील यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!