नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार
मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे सन २०२३-२४ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील
राज्यस्तरीय पत्रकारीता व साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती तरवडी यांच्या वतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात. बुधवार दि.४ डिसेंबर २०२४ रोजी स्मारक समितीच्या सभागृहात सन २०२३-२४ च्या पुरस्कारांची घोषणा स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व सचिव उत्तमराव पाटील यांनी घोषित केले ते असे…
*दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव
पाटील पत्रकारिता पुरस्कार*
राधेशाम जाधव,पुणे (सहसंपादक,द हिंदू बिझनेस लाईन)
*साहित्य पुरस्कार २०२३-२४*डॉ
.अशोक काळे,नागपूर (अपहरण कादंबरी),गितेश शिंदे,ठाणे (काव्य-सिसिटिव्हींच्या गर्द छायेत),डॉ.संदिप राऊत,अमरावती (चरित्र-नवयुग प्रवर्तक संत गाडगेबाबा), डॉ.श्रीधर पवार,मुंबई (संशोधन-ब्लॅक पँथर), प्रिया बापट,गोवा (ललित- मुंगी उडाली आकाशी),डॉ.संजिव कुलकर्णी,पुणे (कथा-शास्त्र काट्याची कसोटी).
*विशेष पुरस्कार:-*
सुनिल शेलार, नाशिक(कथा- झापड), डॉ.गोविंद काळे,लातूर (समिक्षा- दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांची खंडकाव्ये).
वरील ग्रंथनिवड डॉ. सुधाकर शेलार, प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, डॉ. महेबूब सय्यद या निवड समितीने केली आहे.
रविवार दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी तरवडी, ता. नेवासा येथे कॉम. भालचंद्र कांगो यांचे हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत अशी माहीती दीनमित्रकार मुकुंदराव पाटील समितीचे अध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,उपाध्यक्ष कॉम.बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील यांनी दिली.