Saturday, May 23, 2026

पिंपळगाव ग्रामपंचायती कडून अर्चना बाचकर व रुकसाना शेख यांना  पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर पुरस्कार  प्रदान 

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

राहुरी

राहुरी तालुक्यातील पिंपळगाव ग्रामपंचायतीतर्फे ग्रामस्तरावर दिला जाणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार महिला पोलीस कर्मचारी अर्चना बाचकर – नानोर यांच्यासह रुकसाना शेख यांना प्रदान करण्यात आला.

सध्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्ताने पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये महिला पोलीस कर्मचारी अर्चना बाचकर व रूकसाना शेख यांना हा पुरस्कार सरपंच शिवाजी जाधव व उपसरपंच सुनिता जाधव तसेच ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी यांच्या उपस्थित देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारकर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पुरस्काराने काम करण्यास आणखी ऊर्जा मिळेल…

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मला पुरस्कार मिळाल्याने दैनंदिन जीवनात काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे अर्चना बाचकर- नानोर यांनी सांगितले

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!