Monday, April 13, 2026

संघर्ष केल्यास यश हमखास मिळते-उद्धव महाराज मंडलिक

Screenshot 2026-01-05 095857
WhatsApp Image 2026-03-19 at 11.11.21 AM
WhatsApp Image 2026-04-02 at 7.54.58 PM
previous arrow
next arrow
Shadow

भेंडा(नेवासा)

सर्व क्षेत्रात सर्वांनाच घाई झालेली आहे. मात्र झटपट मोठे होण्याचे स्वप्न पहात बसण्यापेक्षा धीर धरून संघर्ष केला तर यश हमखास मिळते असे प्रतिपादन श्रीसद्गुरु नायरणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक (नेवासेकर) यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील पुजा शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत वर्ग-१ अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल व श्वेता काळे यांची अन्न व प्रसाधन तंत्रज्ञ पदावर निवड झाल्याबद्दल नागेबाबा परिवार व भेंडा ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी नागेबाबा भक्त निवासामध्ये उध्दव महाराज मंडलिक यांचे हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बुलढाणा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात
हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ.शिवाजी शिंदे, सौ.वैशाली शिंदे, बुलढाण्याचे उद्योग उपसंचालक प्रमोद लांडे, पैठणचे सहाय्यक निबंधक बलराम नवथर व्यासपीठावर उपस्थित होते.

महंत उद्धव महाराज पुढे म्हणाले की, चांगले कामासाठी परिश्रम करावे लागतात. निरीक्षण करून गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. प्रत्येक मुलांना शिकण्यासारखा हा कार्यक्रम आहे. घरातील वडीलधारी मंडळीच्या सद्गुण ,अनुभवाची शिदोरी यातून प्रेरणा मिळते. माणसा जवळ उद्यम,साहस,धैर्य, शक्ति(बल), बुद्धि आणि पराक्रम असेल तर नशीब आपोआप साथ देते आणि कोणता न कोणता दरवाजा आपल्यासाठी उघडतोच.

सत्काराला उत्तर देतांना पुजा शिंदे म्हणाली की,सुरुवातीच्या काळात मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करायाचे असा विचार होता परंतु वडीलांनी वेगळी दिशा देण्याचे काम केले. माझी जिद्द इच्छाशक्ती आईवडीलांची साथ यामुळेच मला स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. आई-वडील हेच माझे खरे
आयडॉल आहेत. वडीलांचे समाजकारण, संयमी वृत्ती आणि आईंचे न थकता घरकाम यातून मला १६ तास अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. अभ्यास करतानाचा ५ वर्षाचा काळ कठीण होता. आम्हाला ज्या अडचणी आल्या त्या यापुढे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येऊ नये यासाठी हवी ती मदत करु असे सांगितले.

बुलढाणा जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात म्हणाले, या भागात दिवंगत मारुतराव घुले पाटलांनी शिक्षणाचे दालन उभे केलल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ शकले. माझ्यानंतर ३० वर्षात आपल्या भागातून कोणाचीही क्लास वन अधिकारी म्हणून निवड न झाल्याची खंत होती ती पुजा हिने दुर केली.
राजेंद्र चिंधे,श्वेता काळे, बलराम नवथर, प्रमोद लांडे यांनी ही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास लक्ष्मणराव शिंदे, काशीनाथ नवले, नागेबाबा परिवारचे प्रमुख कडूभाऊ काळे,अशोकराव मिसाळ, दत्तात्रय काळे, गणेश गव्हाणे, बापूसाहेब नजन, अजित मुरुकुटे, बबनराव धस, अड.बापूसाहेब गायके, पी.आर.जाधव,नामदेव निकम, अशोकराव वायकर,सुखदेव फुलारी, किशोर मिसाळ, नामदेव शिंदे,दत्तात्रय कांगुणे, राजेंद्र काकडे, शरद गव्हाणे,वैभव नवले, सोपान महापुर, संजय नवले,गणेश महाराज चौधरी, आबासाहेब काळे, सुभाष चौधरी, प्रा.भारत वाबळे,प्राचार्य शिवाजी मुंगसे,प्राचार्य सोपान मते,
डॉ. रजनीकांत पुंड,डॉ.संतोष फुलारी,
डॉ. लहानू मिसाळ,डॉ.रवि आढ़ाव, किसन यादव, संदीप फुलारी,रंगनाथ गव्हाणे,बाबासाहेब गायकवाड,अशोकराव उगले, बबनराव तागड,मुख्याध्यापक संजय कडूस,अशोक शिंदे,अड.सुनील शिंदे,संजय शिंदे, सौ.रिपिका खरात, उपसरपंच संगीता शिंदे आदि उपस्थित होते.

संजय मनवेलीकर यांनी प्रास्ताविक केले. अशोक पंडीत यांनी सूत्रसंचालन केले. सुनील गव्हाणे यांनी आभार मानले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!