नेवासा/प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणूक लढणार आणि महायुती कडूनच लढणार असा निर्धार आ.विठ्ठलराव लंघे यांचे जावई व भेंडा येथील युवा नेते सिद्धांत नवले यांनी व्यक्त केला.
शनिवार दि.८ नोव्हेंबर रोजी संयकाळी ६ वाजता नवले वस्तीवर झालेल्या भेंडा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या विचार विनिमय बैठकित ते बोलत होते.
रामभाऊ पेहेरे, रामकृष्ण नवले, रवींद्र नवले, दादा गजरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.नवले पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षापासून निवडणुकीची तयारी करत असून गटातील १८ गावांच्या वाडी वस्तीवर आपण पोहोचलेल्या आहोत.
युवकांची मोठी साथ मिळत आहे. महायुती कडून लढण्याचा कार्यकर्त्यांकडून आग्रह होत आहे,तो मला ही मान्य आहे. त्याचे कारण केंद्रात राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि तालुक्यातील आमदार ही महायुतीचाच आहे, त्यामुळे विकास काम करण्याचे साधन महायुतीच आहे. भेंडा जिल्हा परिषद गटातील विकास कामाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी महायुती हाच पर्याय आहे. रस्ते वीज या पलीकडचा विकास करून भेंडा गट तालुक्याचा रोड मॉडेल करायचा आहे.
शेतकरी-युवकांना प्रगतीच्या मार्गाने पुढे न्यायचे आहे.त्यामुळे निवडणूक लढायचीच हे निश्चित असून पक्ष कोणता ही असो मात्र आपण महायुती कडूनच निवडणूक लढणार असल्याचे नवले यांनी स्पष्ट केले.
सुनील गव्हाणे,राजेंद्र चिंधे,अजय कोळेकर, दादा गजरे,हरिभाऊ नवले, बबन शिंदे, रामभाऊ पेहेरे
तुषार शिंदे, शिवाजी शेजुळ,ईश्वर काळे, विशाल शिंदे, दिलीप नवघरे, आदिनाथ निकम, किशोर भांगे, अशोक पाठक, निवृत्ती लहारे, हरिभाऊ कापसे यांनी मनोगत व्यक्त केले. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी महायुती कडूनच उमेदवारी करावी अशी सूचना केली.
आदेश जावळे यांनी प्रास्ताविक-सूत्रसंचालन केले.रवींद्र नवले यांनी आभार मानले.


