नेवासा/प्रतिनिधी
अज्ञानामुळे निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेल्या आणि प्रचंड शोषण होत असलेल्या बहुजन समाजाला हलवून जागा करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं. तेच समाजाला जागृतीच काम दीनमित्र वृत्तपत्राच्या माध्यमातून मुकुंदराव पाटलांनी पुढे चालू ठेवलं,महात्मा फुलेंचे सत्यशोधकी विचारांचा वारसा मुकुंदराव पाटलांनी पुढे नेला असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ.सुधीर तांबे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील तरवडी येथे सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या १४० व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय पत्रकारीता-साहित्य पुरस्काराचे वितरण शुक्रवार दि.१९ डिसेंबर २०२५ रोजी तरवडी येथे माजी आ.सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील कार्यक्रमाच्या अध्यस्थानी होते. ज्ञानेश्वर कारखाना संचालक अड. देसाई देशमुख, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा स्नेहल घाडगे,इतिहास अभ्यासक भूषण देशमुख,निवृत्त उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.संदीप सांगळे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपायुक्त संपतराव शिंदे,अब्दुलभैया शेख, दत्तात्रय खाटीक, सुधीर लंके,डॉ.नारायण म्हस्के,दिनकरराव गर्जे, दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे उपाध्यक्ष कॉ. बाबा आरगडे, सचिव उत्तमराव पाटील, इत्यादी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
*डॉ.सुधीर तांबे पुढे म्हणाले की, विद्येमुळे मती गेली असं आपण म्हणतोय परंतु सध्या शिकलेली माणसं ज्या पद्धतीने वागतायेत त्यामुळे माणसांमध्ये शहाणपण निर्माण करायला पाहिजे ते करण्यास आजची आपली शिक्षण व्यवस्था कमी पडतेय का? असा प्रश्न पडतो. आज धर्माचा खरा अर्थ कोणी सांगत नाही.धर्मामध्ये ९० टक्के निती कांड आणि १० टक्के धर्मकांड असायला हवे. मात्र धर्माचे ठेकेदार लोकांना कर्मकांडाच्या नावाखाली समाजाला कमकुवत बनवत आहे. आजच्या धर्मव्यवस्थेने शिक्षणा पेक्षा कर्मकांडाला जास्त महत्व दिलेले आहे.शाळा बंद पडत असतांना मंदिरे वाढत आहेत. ज्यांच्या मनामध्ये मुळातच विषमता आहे, ज्यांना वाटते की आपण श्रेष्ठ आहोत आणि बाकीचे कनिष्ठ आहोत असे कुचक्या बुद्धीची माणसे जगात, भारतात आहेत त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने हिंदू धर्माची अधोगती झालेली आहे.आपले भांडण धर्माशी नाही तर धर्माच्या ठेकेदारा विरुद्ध आहे. विरोधी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काळ्या जादू केली जात आहे,कुठे चाललाय आपला देश. नैतिकता असेलेले कार्यकर्ते तयार करून मुकुंदराव पाटलांचे विचार पुढे नेण्याची आज खरी गरज आहे.
*माजी आ.नरेंद्र घुले म्हणाले की,
मुकुंदराव पाटलांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आपण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम करतो.या निमित्ताने राज्यातील नामवंत व्यक्तींचे विचार ऐकून आपली वैचारिक जडणघडण होते.मी विधासभेत असतांना मुकुंदराव पाटलांचं नाव फार मोठे हे तर सगळ्यां राज्याला सांगितलं. त्याचंच तरवडी गाव हे टँकर फीड व्हिलेज आहे, उन्हाळ्यात पिण्याचा पाण्यासाठी टँकर लावावा लावायची वेळ येते हे सांगून भेंडा-कुकाणा,तरवडी,चिलेखनवाडी अंतरवली या गावांसाठी पाणी योजना मंजूर करून घेतली, त्यासाठी लोकनेते मारुतराव घुले पाटलांनी कारखान्याची १७ एकर जमीन दिली आणि आज या सर्व सहा गावांना पिण्याच्या पाण्याचा नळाद्वारे नियमित पुरवठा होतो आहे.मुकुंदराव पाटलांचं नाव अधिवेशनामध्ये घेतल्याने हे शक्य झाले.
*राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्काराचे मानकरी विश्वास पाटील म्हणाले,स्मारक समितीने कुठलाही प्रस्ताव न मागता काम बघून किंवा कुठल्या दिशेने पत्रकारिता करतोय, पत्रकारितेतील वैचारिक दिशा कोणती आहे हे बघून तरवडी सारख्या गावात मला हा जो पुरस्कार दिला त्याला महाराष्ट्राच्या समाजकारणात फार मोठे मोल आहे.या पुरस्काराने माझी पत्रकारितेची आतापर्यंतच्या जी वाटचाल झाली त्याचेही मोल झालं असं मला वाटतं.
१९१० ते १९६७ पर्यंत त्यांनी ५७ वर्षे हे दीनमित्र म्हणून वृत्तपत्र चालवलं आत्ताच्या काळात २७ महिने काय ५७ दिवस सुद्धा एखाद्या वृत्तपत्र चालवणे शक्य नाही अशी सामाजिक आणि परिस्थिती आहे. वेगवेगळ्या प्रकारचे दबाव माध्यम समूहावर ,वृत्तपत्रांच्यावर बातमीदारांच्या पासून अगदी सगळ्यांच्यावर येत आहेत असे सध्याची स्थिती आहे.
मुकुंदरावांची पत्रकारिता ही पूर्णतः समाजाभिमुख पत्रकारिता होती. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगणारी पत्रकारिता त्यांनी केल्याच आपल्याला दिसते. त्यांनी जे २५०० अग्रलेख जे लिहिले त्यामध्ये एकही अग्रलेख राजकीय नाही, सगळे अग्रलेख ही समाजाला शहाणी करून सोडणारे होते. त्या त्या काळात परिस्थितीत लोक कसे वागतायेत, वेगवेगळ्या जातीभेद कसा आहे, पुरोहित शाही कशी आहे अशातून सर्वसामान्य समाज, माणूस व शेतकरी बाहेर आला पाहिजे अशा पद्धतीचे लेखन त्यांनी केल्याच आपल्याला दिसतं. मुकुंदराव पाटील यांनी जे विचार मांडले ते सतीशोधक विचार म्हणजे काय तर तुम्ही गोरगरिबांच्या शिक्षणासाठी चांगलं प्रयत्न करणे, त्यांच्या मुला-मुलिंच्या लग्नासाठी मदत करणं, त्यांना चांगले विचार देणे म्हणजेच सत्यशोधक विचार होय.
डॉ.सुधीर तांबे यांनी तरवडी येथे मुकुंदरारांच्या नावाने अभ्यासिका काढून दिली, महाराष्ट्रात अभ्यासिका काढून देणारे असे लोकप्रतिनिधी दुर्मिळ होत आहेत. मंदिरे बांधून देण्याची आणि लोकांना धर्माची गोळी द्यायची आणि त्यामध्ये गुंगून ठेवण्याची मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागलेली असताना डॉ.तांबे इथं अभ्यासिका काढून दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन कराव वाटतं.कर्मकांडाच्या देवाच्या मागे लागू नका, तुम्ही माणसांना जपा हाच विचार मुकुंदराव पाटलांनी दिला.
मी मुकुंदराव पाटील यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला मी त्यांच्या लाईनमध्ये कुठे बसतो का ? आपण त्यांच्या कार्याचे थोडा तरी उत्तराधिकारी आहे का ? असा विचार करायला लागलो त्यावेळी मला एक गोष्ट सांगेल की,१९९४ ला मी सत्यशोधकी विचारातून “बारावीची प्रथा आपण आता बंद केली पाहिजे असे वाचकांच पत्र लिहिलं.मला स्वतःला एक मुलगा असताना मी असा विचार केला की आता परत आपल्याला मुलगी व्हायलाच पाहिजे का ? म्हणून स्वतःची मुलगी न होऊ देता अनाथ आश्रमातून २ अनाथ मुली दत्तक घेऊन त्यांना नाव लावल, त्यांच्या नावावर मालमत्ता सुद्धा यापूर्वीच केलेली आहे.कोल्हापुरातील एका बालकल्याण संकुल संस्था आहे तेथील एका अनाथ मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेऊन १६ डिसेंबरला तीचे लग्न लावून कन्यादान हि केले.
साहित्य पुरस्काराचे मानकरी डॉ.प्रभाकर गायकवाड, अब्दुलभैया शेख यांनी ही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास मोहनराव गायकवाड,किशोर भणगे, अजित रसाळ, प्रा.भारत वाबळे,सायमन भारस्कर,शंकर कण्हेरकर, भैरवनाथ भारस्कर, अरविंद खैरनार,सोपान नवथर,प्राचार्य डॉ.शिरीष लांडगे, भाऊसाहेब सावंत,बाबासाहेब घुले, कारभारी तुपे, सचिन क्षिरसागर, बाबासाहेब नाईक,रविंद्र अभंग,सरपंच स्वप्नाली क्षिरसागर, सचिन क्षिरसागर, बाबासाहेब नाईक,प्रा.संजय दरवडे,मुख्याध्यापक सावता गायकवाड आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार विठ्ठलराव लंघे यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.
डॉ.सुधाकर शेलार यांनी प्रास्ताविक केले.
सुयोग सिरसिम व सुनिल इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. यशवंत पाटील यांनी आभार मानले.
*यांना मिळाले पुरस्कार—
कोल्हापूर येथील जेष्ठ पत्रकार विश्वास शामराव पाटील (दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार),रवींद्र रेखा गुरव,कोल्हापूर(कादंबरी-बे दुणे शून्य), माधव जाधव,नांदेड (कथा-आमचं मत आम्हालाच),धनाजी धोंडीराम घोरपडे,सांगली (कविता-जामिनावर सुटलेला काळा घोडा),गजानन इंदुशंकर देशमुख,अमरावती (चरित्र-सबकु सलाम बोलो), संजय बोरुडे,अहिल्यानगर(ललित गद्य-लोकधन), प्रभाकर गायकवाड,परभणी (वैचारिक-मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण), राजेंद्र सलालकर,अहिल्यानगर(समीक्षा-तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण).सचिन वसंत पाटील,सांगली (मायबोली रंग कथांचे) यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.


