अहिल्यानगर/प्रतिनिधी
डोंगरगण ता.जि. अहिल्यानगर येथील खुनाची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली असून खुन करणारे वडील व भाऊ राहुरी येथुन जेरबंद केले आहेत.
या बाबदची अधिकची हकीगत अशी की, दिनांक १७/०२/२०२६ रोजी ११:०० वा.चे पूवीं वांबोरी ते डोंगरगण गावचे शिवारात डोंगरगण घाटात डांबरी रस्त्यापासुन वन विभागाच्या हद्दीत दरीत गट नं.४७४ ता.जि. अहिल्यानगर येथे एक अनोळखी मवत पुरुषाचे प्रेत वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे यास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाकरीता जीवे ठार मारुन प्रेत गोणीमध्ये बांधुन दरीत टाकुन देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी पोकों/१६३६ ज्ञानेश्वर शेषराव तांदळे वय ३८ वर्षे नेम. एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशन गु.र.नं. १२०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलीस अधीक्षक अहिल्यानगर
सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर उघडकीस आणुन आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेचावत आदेशीत केलेले आहे.
सदर आदेशानुसार पोनि किरणकुमार कवाडी यांनी घटना ठिकाणी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करुन गुनद्यातील अनोळखी मयताची ओळख पटविणे कामी व आरोपी निष्पन्न करणे कामी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, दिपक घाटकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास गुन्हा उघडकीस आणून आरोपी ताब्यात घेणेबाबत सूचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले होते.
पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसामध्ये मयताचे वर्णनाचा कोणी इसम मिसिंग आहे काय यावाचत माहिती घेतली, पथकास टाकळीमियों ता. राहुरी येथील एक इसम मिसिंग असून त्याचे नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहितीचे आधारे पथकाने दि. १९/०२/२०२६ रोजी टाकळीमियों याठिकाणी जावून माहिती घेवुन १) शिवाजी शंकर कवाणे (वय-५५ वर्षे) २) योगेश शिवाजी कवाणे (वय ३०) दोन्ही रा. टाकळीमियों ता. राहुरी जि. अहिल्यानगर वांना ताब्यात घेतले. ताब्यातील इसर्माकडे सखोल व बारकाईने विचारपुस करता योगेश शिवाजी कवाणे याने त्याचा मयत भाऊ किरण शिवाजी कवाणे हा नेहमी दारु पिवून आईवडीलांना मारहाण करत असल्याचे कारणावरुन वडोलांचे मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. तसेच मयताचा खुन केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावणे कामी वापरलेली स्विफ्ट कार नंबर एम. एच. ४६ एक्स. ७४६० हि तपासकामी जप्त करण्यात आलेली आहे.
ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे पुढील तपासकामो एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, सोमनाथ घार्गे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


