Wednesday, June 24, 2026

“मुळा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन सोडण्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे आदेश”

WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील मुळा उजव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून आणि उन्हाची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन मुळा उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन उद्या बुधवार दि.२९ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकारयांना दिले असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी दिली.

सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आ. विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचे कडे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्याची विनंती केली होती.

आ.लंघे यांच्या मागणी विचारात घेवून मंत्री विखे पाटील यांनी दि.२९ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सदर आर्तनाचा उजवा कालव्यावरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकरयांना फायदा होणार आहे.
आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल असे नियोजन अधिकाऱ्यानी करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत अशी माहिती आ.लंघे यांनी दिली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!