माय महाराष्ट्र न्यूज:राहुल कोळसे:आजच्या वाढत्या उत्पादन खर्चाला आणि रसायनांच्या दुष्परिणामांना उत्तर देणारी ताक–अंडी आधारित नैसर्गिक शेती पद्धत यशस्वीपणे राबवणाऱ्या युवा शेतकरी स्वप्नील देशमुख ( ताक अंडी खत संशोधक ) यांच्यातर्फे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील तिसगाव वाडी,कोल्हार बुद्रुक 5 मार्च ते 10 मार्च रोजी भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.
या प्रदर्शनामध्ये 20 पेक्षा अधिक पिके व 40 पेक्षा जास्त वाणांच्या फळभाजीपाला ताक–अंडी आधारित प्रयोगांतून तयार केलेले प्रत्यक्ष शेतातील अनुभवांसह मांडण्यात येणार आहेत.प्रदर्शनातील प्रमुख वैशिष्ट्ये असे की कमी खर्चात जास्त उत्पादन, झाडांची ताकद, मुळांची वाढ व नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती,रासायनिक औषधांवरील अवलंबनात घट,दर्जेदार, टिकाऊ व बाजारयोग्य उत्पादन,शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित प्रयोग,प्रदर्शनात पाहायला मिळणारी पिके (उदाहरणार्थ) भाजीपाला, फळपिके, फुलपिके आणि इतर विविध शेती प्रयोग सर्व ताक–अंडी आधारित शेती पद्धतीने युवा शेतकऱ्यांचा पुढाकार हे प्रदर्शन होणार आहे.
शेतीत बदल घडवू इच्छिणारे शेतकरी,युवा उद्योजक, कृषी अभ्यासकआणि नैसर्गिक शेतीत रस असलेले सर्वांसाठी हे प्रदर्शन एक प्रेरणास्थान ठरेल.हे प्रदर्शन सकाळी 9 ते संध्याकाळ 6 पर्यंत यावेळत खुले राहणार आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन युवा शेतकरी स्वप्नील देशमुख ( ताक अंडी खत संशोधक ) यांनी केले आहे.


