अहिल्यानगर/सुखदेव फुलारी
अनेक वर्षांपासून नगरमधील प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ अशी ओळख असलेल्या डॉ.संदीप गाडे यांचे इंपल्स हॉस्पिटल आता त्यांच्या मनमाड रस्त्यावरील जुन्या हॉस्पिटलच्याच पाठीमागील बाजूस अत्यंत प्रशस्त अशा वास्तूत स्थलांतरीत होत आहे. हॉस्पिटलचा स्थलांतर आणि लोकार्पण सोहळा उद्या रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे असणार आहेत. हॉस्पिटलच्या स्थलांतर आणि लोकर्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. संदीप गाडे यांनी पत्रकार परिषदेत केले.
हॉस्पिटलच्या स्थलांतर आणि लोकार्पण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल राज्यमंत्री आमदार सुरेश धस, आमदार संग्राम जगताप, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार हे असणार आहेत. याशिवाय महंत भास्करगिरी महाराज, महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री, महंत बबन महाराज बहीरवाल यांचे शुभआशिर्वाददेखील मिळणार आहेत. सदर कार्यक्रमास खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ.गाडे यांनी दिली.
हृदयविकाराशी निगडीत आधुनिक उपचार केंद्रात अँजीओग्राफी, अँजीओप्लास्टी, बायपास सर्जरी यासाठीचे उच्च दर्जाच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या सर्व शस्त्रक्रिया इंपल्स हॉस्पिटलमध्ये होणार आहेत. या विभागात हृदयविकारासाठी जीवनदायी ठरर्णाया गोल्डन हावरमध्ये प्रायमरी अँजिओप्लास्टी करण्याची जिल्ह्यात प्रथमच १२८ स्लाईस कार्डियाक सीटी स्कॅन मशीन इंपल्स हॉस्पिटलमध्ये हृदयविकारासाठी अत्याधुनिक असे उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात प्रथमच १२८ स्लाईस कार्डियाक सीटी स्कॅन मशिन इंपल्स हॉस्पिटलमध्ये बसविण्यात आले आहे. या मशिनद्वारे सीटी स्कॅनच्या माध्यमातूनदेखील हृदयाची अँजिओग्राफी आता होणार आहे. रुग्णाला हृदयविकाराचा झटका येण्याआधीच हृदय विकाराचे निदान होण्यासाठी १२८ स्लाईस कार्डियाक सीटी स्कॅनची खूप मदत होणार असल्याची माहिती डॉ. संदीप गाडे यांनी दिली.
अत्याधुनिक वैद्यकीय उपचार करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये १०२ बेडची व्यवस्था रुग्णांसाठी केली असून ४० बेडचे सुसज्ज असे आयसीयु सेंटर तयार केले आहे. याशिवाय फिलिप्स कॅथलॅब, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सीटी स्कॅन, एक्स-रे, अॅडव्हान्सड् डायग्नोस्टीक सेंटर, डायलिसीस सुविधा आणि रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या वाहनांसाठी प्रशस्त पार्कंग व्यवस्थाही असल्याची माहिती डॉ. गाडे यांनी दिली. इंपल्स हॉस्पिटलमध्ये मेंदूचे विविध विकार, अपघात विभाग, लॅप्रोस्कोपी आणि शस्त्रक्रिया विभागही आहे. हॉस्पिटलमध्ये हृदय रुग्णांसाठी डॉ. संदीप गाडे यांच्या जोडीने प्रख्यात
हृदय शल्य चिकीत्सक डॉ. श्रीरंग रानडे हे उपलब्ध असणार आहेत. याशिवाय ४० बेडचे सुसज्ज आयसीयु सेंटर असणार असून यामध्ये फिजीशियन इंटेन्सिवीस्ट डॉ. ईश्वर कणसे व डॉ. संजय वरुडे हे चोवीस तास सेवा देणार आहेत. लॅप्रोस्कीपीकमध्ये सर्जन डॉ. महेश घुगे यांचे अत्याधुनिक सेंटर असेल. तसेच अॅक्सीडेंट रुग्णांसाठी ट्रामा सेंटर असून त्यामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर चौधरी आणि डॉ. ऋषीकेश पवार सेवा देणार आहेत. याशिवाय पॅथॉलॉजिस्ट डॉ. बी. बी. शिंदे, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. विजय गाडे, रेडीओलॉजिस्ट डॉ. संदीप गायकवाड, स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. अतुल गुगळे, बालरोग तज्ज्ञ डॉ. सोनाली कणसे ही टीम देखील रुग्णांच्या सेवेत असणार असल्याची माहिती डॉ. गाडे यांनी दिली.


