माय महाराष्ट्र न्यूज:आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 405 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.मंगळवारी पक्षाने उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. या यादीत
राजस्थानमधील दोन नावांचा समावेश आहे. तर टी. बसंत कुमार सिंग यांना इनर मणिपूरमधून संधी मिळाली आहे.याआधी रविवारीच भाजपची पाचवी यादी आली होती. ज्यामध्ये 111 नावांची घोषणा करण्यात
आली होती.भाजपने पहिल्या यादीत 195 नावे जाहीर केली आणि नंतर 72 उमेदवारांची दुसरी यादीजाहीर केली. यानंतर 9 आणि 16 उमेदवारांची तिसरी आणि चौथी यादी जाहीर करण्यात आली. चौथी
यादीत उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र आणि पूर्वोत्तर राज्यांची नावे आहेत. यातच भाजपने महाराष्ट्र,हरियाणा, यूपी, गुजरात, राजस्थान, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये आतापर्यंत 405 जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत.भाजपच्या उमेदवारांमध्ये कंगना राणौत,
जस्टिन अभिजीत गांगुली,मनेका गांधी यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. कंगना राणौत पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. भाजपने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह,राजनाथ सिंह,
नितीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, स्मृती इराणी आणि पियुष गोयल या नावांचा समावेश आहे.हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे मनोहर लाल खट्टर आता कर्नाल लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. याआधी त्यांनी
आमदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचे खासदार झाल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्री केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील लुथियाना येथील काँग्रेसचे खासदार रवनीत बिट्टू यांनी
मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजप कार्यालयात त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. रवनीत बिट्टू हे पंजाब काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात. ते राहुल गांधी यांचे समर्थक आणि जवळचे मित्र असल्याचेही बोलले जाते.