माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सुनावणी आज अवघ्या दोन तासात संपली. पुढील सुनावणी 14 मार्चला होईल.
सत्ता संघर्षावरील सुनावणीचा आज सलग तिसरा दिवस होता. शिंदे गटाकडून आज हरीश साळवी यांनी युक्तिवाद केला.साळवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर युक्तिवाद केला. मुख्यमंत्री नसतील तर कोणाला
तरी सरकार स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे लागेल. मग अशा वेळी राज्यपाल शिंदे गटाला बहुमत चाचणीला सामोरे जाण्यासाठी सांगू शकतात का, तर निश्चितच ते तसं करू शकतात. असा युक्तिवाद साळवी यांनी केला.
साळवी यांच्या युक्तिवाद जवळपास आणखी एक ते दीड तास चालला. त्यानंतर मुख्य न्यायाधीश यांनी साळवी यांना ब्रेक देऊन मंगळवारी पुढील युक्तिवाद ऐकू. तसेच नीरज कौल यांचाही
युक्तिवाद तेव्हाच ऐकू. ठाकरे गटाचे सिब्बल यांना देखील पुन्हा उत्तर देण्यासाठी वेळ दिला जाईल, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी 14 मार्च रोजी होईल असे म्हटले.