Saturday, September 23, 2023

लग्नानंतर 6 महिने या 5 गोष्टींसाठी सर्वच लोक भांडतात ?

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर सगळं गोड गोड असेल आणि आपण सुखाने संसार करू अशी स्वप्ने कपल्स पाहतात. पण जेव्हा खऱ्या अर्थाने संसार सुरू होतो तेव्हा मात्र हळुहळू वाद होऊ लागतात.

अनेकदा वाद हे लहान सहान गोष्टीवरून देखील होतात. अनेकदा वाद हाताबाहेर सुद्धा जातात. यातून बऱ्याचदा एवढा राग येतो की कपल्स कित्येक दिवस एकमेकांशी बोलतच नाहीत.

लग्नानंतर लगेच अशा गोष्टी होणे खूप वाईट आहे.अशा स्थितीत कपल्सना सुद्धा आपण लग्न करून चूक तर केली नाही न असे वाटू लागते. पण मुळात एवढ्या टोकाचा विचार करण्याची गरज नाही. कारण

लग्नानंतर पहिले 6 महिने सर्वच कपल्समध्ये असे वाद होत असतात.आजकाल लोक लग्नाआधी एकमेकांना चांगले ओळखतात. म्हणूनच लग्नानंतर काहीही न बोलता जोडीदाराने आपल्या मनातील गोष्टी सर्व काही समजून घ्याव्या

अशी त्यांची अपेक्षा आहे. पण मुळात असे करणे अशक्य आहे. कोणीही न सांगता तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखू शकत नाही. केवळ पत्नीच नाही तर पतीचू सुद्धा ही अपेक्षा असू शकते. त्यामुळे बहुतेक

नवविवाहित जोडपे एकमेकांशी भांडतात. जोडीदाराशी बोलल्याने किती सहजपणे काही गोष्टी सुटू शकतात हे कपल्सना हळूहळू कळते.तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी आणि नापसंती आहेत, तशाच त्यांच्याही आहेत.

अशा परिस्थितीत कोणीतरी आपल्यानुसार वागावे अशी अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. एकदा तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्यांच्या सवयींसह स्वीकारले की तुमच्यात अजिबात या गोष्टीवरून वाद होणार

नाहीत. लग्नानंतरपहिल्या काही महिन्यात तुम्हाला हीच शिकवण मिळेल.काही दिवस एकत्र राहिल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता बोरिंग ओल्ड कपल झाले आहात तर ही गोष्ट तुमच्यातील अंतर वाढवू शकते. ही अशी जाणीव आहे

जी विषाप्रमाणे भिनते आणि नात्यात वाद सुरु होतात आणि त्याचेच रुपांतर नेकदा भांडणात होते. नात्यात पर्सनल स्पेस खूप महत्त्वाची असते. जर ती मिळत नसेल तर ते नाते हळूहळू तुटू लागते. एकमेकांविषयीचे प्रेम संपते. आपला पार्टनर

जबाबदारी न वाटता ओझे वाटू लागतो. ह्या सगळ्याचा परिणाम होऊन भांडणे सुरु होतातआपण विवाहित आहोत याची स्वत:ला आपल्याला दररोज आठवण करून देण्याची आणि स्ट्रेस मध्ये जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. या दबावामुळे

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवणे कठीण होऊ शकते. कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती करू नका. मग भले ते प्रेम का असेना. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या दर्जेदार वेळेला जितके जास्त प्राधान्य द्याल तितके तुमचे नाते मजबूत होईल.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!