Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील या दोन तालुक्यात सर्वाधिक कांदा लागवड

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कधी शेतकर्‍यांच्या तर ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणार्‍या कांद्याची गोडी सर्वांनाच असते. कांदा पीक म्हणजे मोठे खर्चिक पीक, लागवडीपासून काढणीपर्यंत कांदा पिकाला पैशाची गरज असते. त्याच सोबत विविध किटक नाशके,

कांदा फुगविण्यासाठीचे टॉनिक यांचा मुबलक मारा केल्यानंतर कांद्याला भाव मिळाला, तर शेतकर्‍यांचा पैसा वसूल अन्यथा भाव न मिळाल्यास शेतकर्‍याला खिशाला कात्री लागण्याची वेळ येते. असे असताना शेतकर्‍यांचा कांदा लागवडीकडे मोठा कल असतो.

कांदा पिकाची लॉटरी लागली तर शेतकर्‍यांचे भविष्यच बदलते. मात्र, हे कधीतरीच घडते.जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कांदा लागवडीत सर्वाधिक पारनेर तालुक्यात 16 हजार 548 हेक्टर क्षेत्र असून त्या खालोखाल 16 हजार 84 हेक्टर क्षेत्र हे नगर तालुक्यात आहे.

श्रीगाेंंदा तालुक्यात 8 हजार 277 हेक्टर तर पाथर्डी तालुक्यात साडेतीन हजार हेक्टर कांदा पिकाचे क्षेत्र आहे. उर्वरित तालुक्यात कांदा पिकाचे लागवडीचे क्षेत्र कमी अथवा नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालात आहे.

दिवाळीच्या दरम्यान गावरान कांदा लागवडी सुरू होतात. हा कांदा उन्हाळ्यात तयार होत असून त्याला फारसा भाव मिळत नाही. मात्र, उत्पादन चांगले निघत असून शेतकरी कमी भाव असल्यास हा कांदा साठवून ठेवतात आणि पावसाळ्यात भाव वाढ झाल्यावर कांदा विक्रीसाठी काढतात.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!