नेवासा
भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कबड्डी प्रशिक्षक प्रशांत काकासाहेब लबडे यांना नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा विभागाचे वतीने उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार जाहिर झाला आहे.शिवसेना नाशिक
जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व क्रीड़ा विभाग जिल्हा प्रमुख अशोक दुधारे यांनी पुरस्कार निवडीचे पत्र श्री.लबडे यांना दिले आहे.
शिवसेना नाशिक जिल्हा यांचे वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार) क्रीडा शिक्षकांना ‘उत्तर महाराष्ट्र क्रीडारत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत. यात प्रशांत लबडे यांचा समावेश आहे.दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सायं. ५.०० वा. सह्याद्री बिझसेन पार्क, मायको सर्कल, तिडके कॉलनी, नाशिक २ येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्री.मारूतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, विश्वस्त माजी आमदार पांडुरंग डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी श्री लबडे यांचे अभिनंदन केले