Tuesday, May 24, 2022

मोठी बातमी: फक्त अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये सुरू बाकीच्यांना…

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागानं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी

इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवण्यात याव्यात असे आदेश देण्यात आले होते. उन्हाळी सुट्टीतही शाळा सुरू राहणार असल्याचं विभागाकडून सांगण्यात आलं होतं.

दरम्यान याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अभ्यासक्रम पूर्ण न झालेल्या शाळाच एप्रिलमध्ये म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू राहणार आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुलांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीचं वेड असतं. बऱ्याचदा वर्षभरापासून कुटुंबात त्याचं प्लानिंग सुरू असतं. उन्हाळ्याच्या सुट्टीत असं करीन..उन्हाळ्याच्या सुट्टीत

तसं करूया…अशी अनेक तयारी सुरू असते. काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीमुळे विद्यार्थी हिरमुसले होते. मात्र शिक्षण आयुक्तांच्या अपडेटमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एबीपी माझाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

देशात कोरोनाचा प्रदुर्भाव गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सुरु आहे. त्यामुळे शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं.

मात्र गेल्या काही महिन्यांमधील कोरोनाची समाधानकारक स्थिती बघता हळूहळू शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

SBI च्या ग्राहकांनो सावधान

    माय महाराष्ट्र न्यूज:भारत सरकारच्या केंद्रीय संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना महत्वाचे आवाहन केले आहे.   एसबीआयच्या ग्राहकांनी त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी...

नगर ब्रेकिंग:कारच्या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज:अज्ञात वाहन व कारच्या अपघातात कारमधील पिता-पुत्राचा मृत्यू झाला. बाजीराव त्रिंबक मिसकर (वय 40) व ओम बाजीराव मिसकर (वय 13, दोघे रा. जळगाव...

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी:३ वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतील रक्तातून HIVचा संसर्ग

माय महाराष्ट्र न्यूज:नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला रक्तपेढीतून मिळालेल्या रक्तातून एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळं नागपुरात खळबळ उडाली...

नगर जिल्ह्यात आजोबांप्रमाणेच सुजय विखेंचा ‘नव्या प्रयोगा’चा मनसुबा

माय महाराष्ट्र न्यूज:काँग्रेसमधील एकेकाळचे दिग्गज नेते दिवंगत बाळासाहेब विखे यांनी १९९१ मध्ये जेव्हा प्रथम पक्ष सोडला, त्यावेळी नगर जिल्ह्यात आपल्या गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण...

राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये-मुरकुटे

नेवासा राज्यातील ओबीसींचे हक्काचे आरक्षण मिळाल्या शिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केली. नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज तहसीलदार रुपेशकुमार...

नगर ब्रेकिंग: संतापजनक:विवाहितेवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शेततळ्यातील पाण्यात विवाहित महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शीतल सतिष केरे असे मयत विवाहितेचे नाव...
error: Content is protected !!