माय महाराष्ट्र न्यूज:महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच आजपासून अनेक मोठे बदल झाले आहेत ज्याचा संबंध थेट तुमच्या खिशाशी संबंधित आहेत. यामध्ये गॅसच्या किमती, बँक सुट्ट्या इत्यादींचा समावेश आहे.
अशात या बदलांशी संबंधित महत्त्वाची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जेणेकरुन तुम्ही स्वतःला कोणत्याही अचानक आलेल्या संकटापासून वाचवू शकाल.
आजपासून झालेल्या बदलांमधील महत्त्वाचा बदल म्हणजे UPI पेमेंट्समधून गुंतवणूक मर्यादा वाढवणे. SEBI च्या नवीन नियमांनुसार, 1 मे पासून, जर तुम्हाला UPI द्वारे कोणत्याही IPO मध्ये
गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंत बोली लावू शकता. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती.मे महिन्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही.
याशिवाय बँकांना या महिन्यात विविध ठिकाणी 13 दिवस सुट्टी आहे. विशेष म्हणजे 1 तारखेला कामगार दिन, 2 तारखेला परशुराम जयंती आणि 3 तारखेला ईद या दिवशी अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील.
तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी गॅसच्या किमतीत काही बदल करतात. गेल्या महिन्याच्या 1 तारखेला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
या महिन्यात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.