Friday, July 1, 2022

लग्नाच्या दिवशी बॉयफ्रेंडने नवऱ्या मुलाला पाठवले मुलीचे private photo अन्

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नाचा दिवस होता…शुभमुहूर्त जवळ येत होता…आणि अशातच वरपक्षाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला…ही

कोणच्या सिनेमाची कहाणी नाही तर खऱ्या आयुष्यात घडलेली घटना आहे. लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने मुलीला लग्नासाठी नकार दिला. यामागील कारणंही तसं धक्कादायकच होतं.

लग्न ठरलेल्या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंडने नवऱ्या मुलाला मुलीचे काही पर्सनल फोटो पाठवले. यानंतर नवऱ्या मुलाकडून लग्नासाठी नकार देण्यात आला.

ही घटना युपीच्या देवरिया जिल्ह्यातील आहे. 23 मे रोजी टिळक कार्यक्रम झाल्यानंतर 25 मे रोजी वरात येणार होती. लग्नाची सर्व तयारीही झाली होती. मात्र मुलाकडून लग्नाचा नकार येताच

सर्वांच्या आनंदावर पाणी फिरलं. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न ठरलेल्या मुलीचं गावातील एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. हा मुलगा सतत नवऱ्या मुलाला फोन करून

लग्नासाठी नकार द्यावा म्हणून दबाव टाकत होता. मात्र नवऱ्या मुलाने त्यांच्या या धमक्यांकडे दुर्लक्ष केलं. मात्र 25 मे रोजी म्हणजे लग्नाच्या दिवशी मुलाने वराला व्हिडिओ कॉल केला आणि दुसऱ्या

मोबाईलवर वधूचे काही खाजगी फोटो दाखवले. अशा परिस्थितीत संतापलेल्या मुलाने लग्नासाठी नकार दिला. जेव्हा या घटनेची माहिती मुलीच्या घरच्यांना कळली तेव्हा त्यांनी

मुलाच्या घरच्यांशी समजूत घातली. मात्र वराला ते मान्य नव्हते. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आणि दोन्ही बाजूंची पंचायत बसली, मात्र कोणताही निकाल न लागल्याने लग्नकार्य थांबवण्यात आलं.

लग्नाचा निर्णय घेण्यासाठी वराने 15 दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी त्यांच्याकडे तक्रार आली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!