Monday, October 25, 2021

अखेर पीक विमा योजनेस मुदतवाढ;ही आहे शेवटची तारीख

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्रातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारने गुरूवारी केंद्र शासनाकडे पाठवल्यानंतर केंद्र सरकारने ही मागणी मंजूर करत २३ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याचे सायंकाळी जाहीर केले.

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यास १५ जुलै शेवटची मुदत होती. आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, करोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे ही मुदत किमान आठवडाभर वाढविण्याची मागणी शेतकरी करीत होते.

त्याची दखल घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून आणखी एक आठवडा म्हणजेच २३ जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी,तसेच या योजनेचा अतिरिक्त भार राज्य सरकाच्या माथी मारू नये अशी विनंती सरकारने केंद्राकडे के ली आहे, असे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी सकाळी सांगितले. त्यानंतर सायंकाळी केंद्र सरकारने मुदतवाढीचा निर्णय जाहीर केला.

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी घेतला असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत गुरुवारी संपत होती. गेले दोन दिवस शेतकऱ्यांना बँका व अन्यत्र तांत्रिक अडचणी येत आहेत. हजारो शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याची

इच्छा असूनही अर्ज भरता आले नाहीत. त्यामुळे मुदतवाढ देण्याची विनंती मी कृषीमंत्री तोमर यांना सकाळी केल्याचे दानवे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांदा आवकेत वाढ तर भावात घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवक व भावात चांगली चढ उतार बघायला मिळत आहे. कधी कांदा पाच हजारांच्या पुढे तर कधी...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकून दप्तराची होळी

माय महाराष्ट्र न्यूज:ऊस दर जाहीर करीत नसल्याने संतप्त झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्क्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी संगमनेर कारखान्याच्या नगर जिल्ह्यातील...

नगर ब्रेकींग:जावयाची सासूस मारहाण कारण वाचून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल

माय महाराष्ट्र न्यूज :मुलीस माहेरी घेऊन जाण्याच्या कारणावरून जावयाने सासूस मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली. याबाबत महानंदा विश्वास घुले (वय...

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...
error: Content is protected !!