Friday, July 1, 2022

Delta नंतर आता Eta variant, पहिला रुग्ण सापडला; किती भयंकर आहे कोरोनाचं हे नवं रूप?

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

 

माय महाराष्ट्र न्यूज: एकिकडे देशात डेल्टा , डेल्टा प्लस कोरोनाने चिंतेत टाकलेलं असताना आता कोरोनाचं आणखी एक नवं रूप समोर आलं आहे. डेल्टानंतर आता एटा कोरोना व्हेरिएंट  आढळला आहे. कर्नाटकमध्ये कोरोनाच्या या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कर्नाटकच्या मंगळुरूत एटा व्हेरिएंटचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. गुरूवारी मंगळुरूतील एका व्यक्तीला एटा व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार चार महिन्यांपूर्वी ही व्यक्ती कतरला गेली होती.

पण एटा संसर्गाचं हे पहिलं प्रकरण नाही आहे. याआधी एप्रिल 2020 मध्ये राज्यात एटा व्हेरिएंटचा रुग्ण सापडला होता, असं राज्याचे नोड अधिकारी आणि कोरोना होल जीनोम सीक्वेंसिंग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं.

तज्ज्ञांच्या मते, मंगळुरूमध्ये आढळून आलेला एटा व्हेरिएंट संक्रमण आता चिंतेचे कारण नाही. हा व्हेरिएंट आजही इओटा, कप्पा आणि लॅम्ब्डासारखा व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट आहे. या व्हेरिएंटबाबत अद्याप शोध सुरू आहे. पण अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट चिंतेचं कारण आहेत. या व्हेरिएंटमुळे संक्रमणाचा वेग वाढला आहे.

एटा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचाही धोका नाही, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. कारण हा व्हेरिएंट जुना आहे, पण त्याची पुष्टी झालेली नाही. जर हा धोकादायक असता तर आतापर्यंत याचे बरेच केसेस दिसून आले असते.

ताज्या बातम्या

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...

फळबाग तोडणी मजूरांचा टेंपो उलटला;एक ठार तर आठ जखमी

नेवासा चालकाचे हलगर्जीपणामुळे फळबाग तोडणेकरीता मजूर घेऊन जाणारा टेंपो पलटी पलटी होऊन टेंपो मधील एकजण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.24 रोजी...
error: Content is protected !!