Monday, October 18, 2021

मलेरिया वरील औषधही कोरोनावर प्रभावी?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:‘कोव्हिड-19’ वरील प्रभावी उपचार शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. ही ट्रायल मलेरिया, ल्युकेमिया तसेच संधीवाताच्या ऑटोइम्युन डिसीजसारख्या आजारांवरील औषधांवर केली जात आहे.

संशोधकांचे म्हणणे आहे की या आजारांमध्ये वापरण्यात येणारी अँटी-इन्फ्लेमेट्री औषधे संक्रमणानंतर अनियंत्रित होणार्‍या रोगप्रतिकारक शक्तीला नियंत्रित करतात. या औषधांच्या माध्यमातून ‘कोव्हिड’वरील स्वस्त आणि परिणामकारक उपचार शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
याबाबतच्या संशोधनाची

माहिती ‘फ्रंटियर्स इन इम्युनोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी म्हटले आहे की कोरोना संक्रमणानंतर अनेक रुग्णांमधील रोगप्रतिकारक यंत्रणा अनियंत्रित होऊन ती शरीरावरच हल्ले करू लागते. याचा अर्थ ती अतिसक्रिय होऊन विषाणूशी लढण्याबरोबरच शरीरातील पेशींचेही नुकसान करू लागते.

अशावेळी रुग्णाच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होऊ शकतात आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. वैज्ञानिक भाषेत या स्थितीला ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असे म्हटले जाते.तज्ज्ञांच्या एका पॅनेलने या तीनही प्रकारच्या औषधांना यासाठी निवडले जेणेकरून ‘कोव्हिड’पासून होणारे मृत्यू रोखले जातील.

या ट्रायलला ‘सॉलिडेरिटी प्लस’ असे नाव देण्यात आले आहे. 52 देशांच्या 600 रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांवर ही चाचणी घेतली जाईल.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!