Wednesday, October 27, 2021

आनंदाची बातमी: केंद्र सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाखांची मदत,लगेच अर्ज करा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने योजना आणत असते. आता सरकार शेतकऱ्यांचं उतपन्न वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यानंतर कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सरकार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देत आहे.

शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राशी व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहे. केंद्र सरकारची ही नक्की काय योजना आहे, ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी काय करावं लागेल, हे आपण जाणून घेऊयात.

…असे मिळणार 15 लाख
सरकारने पीएम किसान एफपीओ या योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेनुसार, शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. देशातील शेतकऱ्यांना नव्याने कृषी आधारित उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना एकत्र येत एक संघटना किंवा कंपनी सुरु करायला लागेल. यामुळे शेतकऱ्यांना कृषी शेतीशी संबंधित उपकरणं, फर्टीलायझर्स, बियाणं यासारख्या वस्तू खरेदी करणं सोयीस्कर होईल.

योजनेचं उद्देश काय?
शेतकऱ्यांना थेट फायदा व्हावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याच हेतुने सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दलालाकडे जावं लागणार नाही. शेतकऱ्यांना या योजनेनुसार, शेतकऱ्यांना 3 वर्षांमध्ये हफत्यात ही रक्कम दिली जाणार आहे. यासाठी 2024 पर्यंत 6 हजार 885 कोटी रुपये सरकारकडून खर्च केले जाणार आहेत.

योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. सरकारने आतापर्यंत या योजनेसाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु केलेली नाही. लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सरकारनुसार, लवकरच या योजनेची अधिसूचना काढण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!