Monday, January 17, 2022

ज्येष्ठ नागरिकांना एस महामंडळाकडून मोफत पास मिळणार ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी पास मिळणार असल्याच्या एका मेसेजनं सध्या धुमाकूळ घालत आहे. व्हॉट्सअपवर हा मेसेज वा-यासारखा पसरत आहे. त्यात ज्येष्ठांना एसटीचे मोफत पास दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. नेमका हा मेसेज काय आहे आणि त्याचं सत्य काय आहे जाणून घेऊया. 

काय आहे व्हायरल मेसेज?

ज्येष्ठ नागरिकांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 4000 किलोमीटर प्रवास मोफत करता येणार आहे. आपले आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा मतदान स्लिप देऊन आणि 55 रुपये भरून जवळच्या एसटी डेपोत हे कार्ड मिळेल.

अशा आशयाचा हा मेसेज आहे. हा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर आल्यानं ज्येष्ठ नागरिकांकडून मोफत पाससाठी विचारणा होऊ लागली आहे. खरंच असे मोफत पास मिळतायेत का? सरकारनं यासाठी कोणती नवी योजना आणलीय का?

दरम्यान औरंगाबादच्या विभाग नियंत्रकांचं कार्यालय गाठलं. तिथल्या अधिका-यांना हा मेसेज दाखवला आणि मग त्यांनी जे सांगितलं ते धक्कादायक आहे.

हा मेसेज पाहिल्यावर अनेकांनी एसटी डेपोत गर्दी सुद्धा केली होती. मात्र मोफत पासची कोणतीही योजना नसून केवळ ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू असल्याचं एसटी महामंडळानं स्पष्ट केलं. ज्येष्ठांसाठी मोफत पास देण्याची कोणतीही योजना एसटी महामंडळाने सुरू केलेली नाही. ज्येष्ठांसाठी केवळ स्मार्ट कार्डची योजना सुरू आहे. त्याचा आणि मोफत पास योजनाचा कोणताही संबंध नाही.

खोडसाळपणा करण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक हा मेसेज व्हायरल केल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे तुम्ही अफवांवर विश्वास ठेऊ नका. ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाकडून मोफत पास मिळत असल्याचा मेसेज आमच्या पडताळणीत असत्य ठरलं आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!