Tuesday, January 18, 2022

राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, धक्कादायक आकडेवारी समोर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात कोरोनाची लाट ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, लोकल सेवा सुरू झाली आहे. रस्ते पुन्हा एकदा गर्दीने फुलून गेली आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात असलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आज अचानक वाढली आहे.

मागील 24 तासात कोरोनामुळे 216 जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजारांच्या पुढे गेली आहे.राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून गेल्या 24 तासांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज राज्यात तब्बल 5031 नवे रुग्ण आढळून आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ही रुग्ण संख्या 4 हजाराच्या घरात होती. पण, आता अचानक त्यात वाढ झाली आहे. तर 216 जणांचा कोरोनामुळे मृ्त्यू झाला आहे. मृत रुग्णांची संख्या वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सोमवारी ही संख्या १०५ इतकी होती. आज दुपट्टीने वाढ झाली आहे. राज्यात मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे.

रुग्णांची संख्या वाढली असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आज 4,380 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.०७ टक्के इतके आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णाची संख्या पुन्हा 50 हजाराच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डेल्टा विषाणू वाढता वाढे!

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी  कोविड विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण करणाऱ्या मुंबईतील पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले आहेत. त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली. कोविड चाचणीच्या 188 नमुन्यांमध्ये सर्वाधिक 128 रुग्ण डेल्टा विषाणूचे आहेत. अल्फा 2, केपा 24, तर इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू आढळले असल्याचं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आलं.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!