Wednesday, October 27, 2021

नगर ब्रेकींग:बाळ बोठेचा जामीन फेटाळला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे याचा जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. बोठेच्या जामीन अर्जावर बुधवारी दुपारी सुनावणी झाली. बोठेने जामीनासाठी 14 जुलै रोजी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. 30 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली होती. जरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी मारेकर्‍यांसह पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी जरे यांच्या हत्येची सुपारी पत्रकार बाळ ज. बोठे याने दिली असल्याचे सांगितले.

 पोलिस तपासात नाव समोर आले असल्याची माहिती बोठेला समजताच तो फरार झाला होता. त्याला 102 दिवसांनंतर हैद्राबाद येथील बिलालनगर परिसरातून अटक करण्यात आली. या प्रकरणाचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी न्यायालयात दाखल केलेले आहे. बोठेने नाजुक प्रकरणातून जरे यांची हत्या केली असे दाखल दोषारोपपत्रात नमुद करण्यात आले आहे.

जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ बोठे सध्या न्यायालयीन कोठडीत पारनेर येथे आहे. जामीन अर्जावर आरोपीपक्षातर्फे आणि सरकार पक्षाच्यावतीने अगोदर युक्तिवाद झाला आहे. युक्तिवादानंतर न्यायालयाने आज बोठेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!