Saturday, January 22, 2022

तोपर्यंत पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता कमी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पेट्रोलच्या वाढत्या दराने सामान्यांचं कंबरडं मोडलंय. अशावेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, जोपर्यंत राज्य सरकार पेट्रोलला जीएसटी अंतर्गत आणण्यास सहमत होत नाही. तोपर्यंत पेट्रोल स्वस्त होण्याची आशा कमी आहे. 

वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल सरकारने लादलेल्या जबरदस्त करांमुळे राज्यात पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रति लीटर पार केली आहे.पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, केंद्र सरकार पेट्रोलवर 32 रुपये प्रति लीटर कर आकारते. कच्चे तेल $ 19 प्रति बॅरल असताना देखील कर समान होता.

कच्च्या तेलाची किंमत आता $ 75 प्रति बॅरल असतानाही कर समान राहतो. ते म्हणाले की कर म्हणून गोळा केलेल्या रकमेमधून केंद्र सरकार रेशन, घर आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत एलपीजी, एलपीजी कनेक्शन मोफत देत आहे. याशिवाय, शेतकरी आणि सामान्य माणसांसाठी आणखी अनेक योजना चालू होणार आहेत.

पेट्रोल जीएसटी अंतर्गत आल्यास किती स्वस्त होईल? एका अहवालानुसार, जर पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणले गेले, तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 75 रुपये प्रति लीटरपर्यंत घसरू शकतात. म्हणजेच सामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली लखनौमध्ये झालेल्या जीएसटी बैठकीत पेट्रोलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यावर चर्चा झाल्याचे वृत्त होते. केंद्र सरकारला फक्त पेट्रोल आणि डिझेलच नव्हे तर मद्यही जीएसटीच्या कक्षेत आणायचे आहे. परंतु राज्य सरकार त्यांच्यावर लावण्यात आलेल्या करातून प्रचंड उत्पन्न मिळवतात.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!