Tuesday, November 30, 2021

विखे पाटलांचा निशाणा:नगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्री एकही कोविड सेंटर सुरू करू शकले नाही उलट…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला केंद्र सरकार जर ५० हजार रुपयांची मदत करणार असेल तर राज्यातील आघाडी सरकारला ५ लाख रुपयांची मदत करायला काय हरकत आहे?’ असा सवाल भाजचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संकटात देशभरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात केलेल्या मदतीचा उल्लेख करून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. विखे पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

केंद्र सरकारच्या माध्यामातून ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करून मोफत लसीकरणाची मोहीम हाती घेतली. त्यामुळे आतापर्यंत देशातील ८५ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होवू शकले. राज्य सरकार मात्र फक्त आमचा चेक तयार असल्याच्या वल्गना करीत बसले.

त्यामुळे लसीकरणाचे वाचलेले सर्व पैसे राज्य सरकारने सामान्य माणसांच्या मदतीसाठी वापरण्याची आवश्यकता आहे. करोना संकटात मंत्री मुंबईत बसून राहिले. मात्र आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी जीवावर उदार होवून काम करीत होते.

नगर जिल्ह्यातील तिन्ही मंत्री एकही कोविड सेंटर सुरू करू शकले नाहीत. त्या उलट प्रवरा कोविड सेंटर, डॉ. विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना मोठी मदत होवू शकली,’ असेही विखे पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!