Friday, October 22, 2021

नगर ब्रेकींग :दोघांना वाचवले, पण पोटच्या मुलाला वाचवताना वडीलांचा अंत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील  मंडपी बंधाऱ्यावरून मुशर्तपूरकडे तिघे मित्र जात असताना बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने एक जण पडला. त्याला वाचविण्यासाठी दोघे पाण्यात उतरले. मात्र हे तिघे बुडत असल्याचे पाहून त्या तिघांपैकी एका मुलाच्या वडिलांना समजले त्यांनी ही वाहत्या पाण्यात उडी घेत इतर दोन मुलांना जीवनदान दिले.

मात्र पोटचा गोळयाला वाचवत असताना बाप लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.मुशर्तपूर शिवारातील गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधाऱ्यात दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. संजय मारुती मोरे (वय ३५), सचिन संजय मोरे (वय १५) अशी मयत झालेल्याची नावे आहेत.

या घटनेची माहिती कळताच तहसीलदार विजय बोरुडे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले बचाव पथकासह हजर झाले. कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे हे कारखान्याच्या रुग्णवाहिकेसह बचाव कार्य करणाऱ्या यंत्रणेसह हजर होऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोन तासाच्या अथक प्रयत्नाने

बाप लेकांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. यावेळी सरपंच पती अनिल दवंगे, तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर शेख, संतोष गोसावी यांच्यासह अनेकांनी बाहेर काढण्यात मदत केली.मुशर्तपूर शिवाराच्या गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधाऱ्यात सचिन संजय मोरे (वय १५), ओम दत्तात्रय मोरे (वय १२) व शुभम योगेश पवार

हे तिघे मुले बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा तोल पाण्यात गेल्याने तो बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी आरडा ओरड करीत इतर दोघे पाण्यात उतरले. पाण्याच्या वेगामुळे मुलांना पोहता येत असूनही गटांगळ्यात खात होते. आपला मुलगा, पुतण्या व त्यांचा मित्र पाण्यात

बुडत असल्याचे संजय मारुती मोरे यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहत्या पाण्यात उडी मारुन शुभम पवार व पुतण्या ओम मोरे यांना पाण्यातून यशस्वी बाहेर काढून जीवदान दिले. सचिन मोरेला वाचवण्यासाठी बाप म्हणून काळजीने त्याला पाण्या बाहेर काढताना धरलेला हात निसटला. मुलगा वाहत गेला पुन्हा

त्याचा पाण्यात शोध घेताना संजय मोरे व सचिन मोरे या दोघा बाप-लेकांचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. मयत संजय मोरे यांच्या पाश्‍चात पश्‍चात पत्नी, मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. मयत सचिन हा मोठा मुलगा होता.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!