Saturday, October 23, 2021

नगर जिल्ह्यातील घटना :अल्पवयीन मुलास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर रोड गायकवाडवस्ती येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलाची आई वैशाली सचिन करपे ह्या न्यायालयीन कामकाजासाठी औरंगाबाद येथे गेल्या होत्या. घरी वैशाली यांच्या आई तसेच दोन मुले होती.

मात्र न्यायालयीन कामकाज आटोपून घरी आल्या असता त्यांचा अल्पवयीन मुलगा राज उर्फ लकी (वय 11) हा दुपारी जेवण करून बाहेर गेला तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मुलगा राज उर्फ लकी यास कोणीतरी अज्ञात

व्यक्तीने माझे कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून नेले आहे, असे वैशाली करपे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.लकी हा अंगाने सडपातळ असून रंगाने सावळा, उंची 4 फूट, अंगात चॉकेलेटी पांढर्‍या पट्ट्याचा टीशर्ट, काळ्या रंगाची जीन्स पँट, नाक सरळ, काळे डोळे, पायात सँडल, मांडीवर तीळ व उजव्या हाताच्या पंजावर

ओम असे गोंदलेले आहे. अशा वर्णनाचा मुलगा कोणास आढळल्यास त्यांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वैशाली सचिन

करपे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 696/2021 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुध्द भादंवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

वा जबरदस्त: अवघ्या 1 रुपयात खरेदी करा सोनं

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 1 रुपयालाही सोने खरेदी करू शकता. डिजिटल गोल्ड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू...

नगरचे पालकमंत्री बदलणार? या दोन नावांची चर्चा

माय महाराष्ट्र न्यूज:मंत्री हसन मुश्रीफ नगरचे पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात...

नगर जिल्ह्यातील या भाजप आमदारांचा गंभीर आरोप ठाकरे सरकार म्हणजे ….

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यासह अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. यात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामेही केले मात्र नुकसान भरपाई मिळालेली नाही....

राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिला इशारा म्हणाले तर पळता भूई थोडी होईल 

माय महाराष्ट्र न्यूज: देशात 100 कोटी लसींचे डोस पूर्ण करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल राहाता तालुक्यातील लोणी येथे आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांच्या हस्ते आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात...

महाराष्ट्रातील संतापजनक घटना:वेश्या व्यावसायासाठी आईने पोटच्या मुली सोबत केले असे काही…

माय महाराष्ट्र न्यूज:आईने स्वत:च्या अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलले आहे. एका नातेवाईकाच्या मदतीने तिला मुंबईच्या एका दलालाला 20 लाख रुपयांना विकण्यात आले. सलग...

नगर जिल्ह्यात आजही लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या  होत आहेत. असे जरी असले तरी अजून कोरोनाचा धोका...
error: Content is protected !!