Friday, October 22, 2021

खा सूजय विखेंचा इशारा मी ती वाट पाहतोय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाविकास आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार महाविकास आघाडीने राज्यभर आंदोलनेही केली. त्यामुळे आज भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य करत टीका केली. या भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही महाविकास आघाडीवर जोरदार टीकेची झोड उठविली.

श्रीगोंदे शहरातील विविध विकासकामांचा प्रारंभ आज खासदार डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 60 वर्षांवरील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत सहायक साधनांच्या वाटपासाठी तपासणी शिबिर झाले.

विखे पुढे म्हणाले, की रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कामाचा दर्जा चांगला हवा, ही पहिली अट आमची राहते. दर्जेदार कामे झाली तरच त्या निधीचा उपयोग होतो. श्रीगोंद्यासह जिल्ह्यात केंद्र सरकारचा मोठा निधी त्यासाठी खर्च होत आहे. निधीसाठी कोरोनाचे कारण केंद्राने पुढे केलेले नाही.

ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, तेथे निधी देऊन कामे सुरू आहेत. मात्र, त्याच वेळी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा सामान्यांसाठीचा विकास कुठेही दिसत नाही.उत्तर प्रदेशातील घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यातील सामान्यांना वेठीस धरण्याचा उद्योग झाला आहे. केंद्राचा निधी आला

त्या रस्त्यांच्या कामाचा नारळ वाढविण्यासाठी विकासपुरुष उपस्थितीत राहतात. जिल्ह्यात आमचे काम उत्तम सुरू आहे, ते दिसतच आहे, असा टोला विखे यांनी लगावला.अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या संदर्भात डॉ. विखे म्हणाले, की मी तर जिल्हा परिषद,

पंचायत समितीच्या निवडणुका लागण्याची वाट पाहतोय. प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांचा पर्दाफाश करू, असे सूचक विधानही त्यांनी या वेळी केले

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!