Wednesday, October 27, 2021

चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीचे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका,” असा हल्ला चित्रा वाघ यांनी केला.

तसेच चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, अशी बोचरी टीका देखील चित्रा वाघ यांनी केली.राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांची महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना शूर्पणखेची उपमा दिली.

याच टीकेनंतर शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे या रुपाली चाकणकर यांची ढाल म्हणून समोर आल्या आहेत. त्यांनी वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे. एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ

कोणत्या मनोवृत्तीचे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असा घणाघात कायंदे यांनी केलाय.एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिले आहे. खरंतर एक सहकारी म्हणून

त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतु त्यांनी चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिली. त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणले आहे. चित्राताई वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं तर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, असं कायंदे म्हणाल्या.

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजप नेते राम कदम यांचा आधार घेत चित्रा वाघ यांच्यावर थेट हल्ला केला. “राम नावाचे आमदार मुली पळवण्याची भाषा करतात. त्यावर चित्राताई वाघ मात्र काहीच बोलणार नाहीत,” असं कायंदे म्हणाल्या आहेत.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!