माय महाराष्ट्र न्यूज:माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे.
“नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतयं. रोज सकाळी उठल्यावर कुठलातरी फोटो शोधायचा. त्या आधारे टि्वट करुन, सनसनाटी निर्माण करण्याच त्यांचं काम सुरु आहे” असे प्रवीण दरेकर म्हणाले.
मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानाची चौकट असते, काही अटी असतात, त्याचा भंग नवाब मलिक करत आहेत” असे प्रवीण दरेकर म्हणाले. “व्यक्तीगत आरोप, जीतवरुन बोलणं हा भंग आहे. अशा प्रकारे गोपनीयतेचा भंग करणं, जातीवाचक
बोलणं या सगळ्याचा विचार करुन, नवाब मलिकांचा राजीनामा मागतिला पाहिजे” असे दरेकर म्हणाले.फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत
चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मलिक यांनी सोमवारी सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा असं या व्यक्तीचे नाव आहे.
निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकांनीही हा फोटो ट्विट केला आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक कऱण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.या आरोपांना प्रवीण दरेकरांनी उत्तर दिले आहे. जावयावर केलेल्या कारवाईमुळे आलेल्या नैराश्यातून, वैफल्यातून नवाब मलिक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या
कुटुंबीयांवर आरोप करत आहेत. सकाळी उठून काहीतरी आरोप करणे, ट्विट करुन खळबळ माजवण्याचा खेळ सुरु आहे, हे रोजचे झाले आहे, त्यांचे हे बेताल वागणे अत्यंत चूकीचे असल्याचे दरेकरांनी म्हटले आहे. “व्यक्तीगत आरोप, जीतवरुन बोलणं हा भंग आहे.
समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम आहेत, कोण कुठल्या जातीत जन्माला येतो,हा अट्टहास कशासाठी? असा सवाल करत दरेकरांनी नवाब मलिक यांनी शपथेचा भंग केला असल्याचा आरोपही यावेळी दरेकरांनी केला आहे.