माय महाराष्ट्र न्यूज:नगरजिल्ह्यात 5 ते 7 मार्च या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या फटक्यात जिल्ह्यातील एकूण 1 हजार 195 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
2 हजार 899 बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने 1 कोटी 54 लाख 827 रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील
38 गावांतील 1 हजार 195 हेक्टर क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला. त्यात सर्वाधिक 1 हजार 31.47 हेक्टर बागायती क्षेत्राचा समावेश होता. 123.75 हेक्टर जिरायती पिकांचे, तर 39.80 हेक्टर
फळबागांच्या क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शासनाच्या अहवालात नमूद केले आहे.राहुरी तालुक्यात सर्वाधिक 475 हेक्टर, अकोले तालुक्यातील 413.55 हेक्टर, तर नेवासा तालुक्यातील 261 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
बाधित शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे 1 कोटी 54 लाख 827 रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या काही भागात 15 मार्च रोजी
झालेल्या अवकाळी पावसाने श्रीगोंदा तालुक्यातील साडेतीन हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे नुकसान झाले असून, त्याच्या भरपाईसाठी निधी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे.
तालुकानिहाय नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये, कंसात शेतकरी संख्या)
नगर 27.40 (42), कर्जत 0.60 (1), राहुरी 475 (1056), नेवासा 261.09 (443), अकोले 413.55 (1318), कोपरगाव 17.38 (39).